Thalipeethachi bhajani recipe in marathi thalipith bhajani

३०-४० मिनिटे

Thalipeeth Bhajani / Multigrain flour in english इथे इंग्लिशमध्ये रेसिपी आहे. 

थालीपीठाच्या भाजणीचे साहित्य:

तांदूळ - ४ वाट्या 

ज्वारी - २-३ वाट्या

बाजरी - १ वाटी (यांनी रंग काळा येतो. चालत असल्यास प्रमाण वाढवावे.)

मूग हिरवे - १ वाटी

चणे - १/२ वाटी

चणाडाळ - १/२ वाटी

गहू - १/४ वाटी

उडीद डाळ - १/२ वाटी 
धणे - १ वाटी 
जिरे - १/२ वाटी 
ओवा - १/२ वाटी
भाजताना हलवण्यासाठी शक्यतो लाकडी चमचा/कालथा वापरावा म्हणजे चटके नाही बसत.

थालीपीठाची भाजणी कशी करावी - कृती:

  • तांदूळ स्वच्छ धुवून उन्हात व्यवस्थित कोरडे वाळवावेत.
  • वाळल्यावर पसरत कढईत थोडे थोडे तांदूळ घेऊन भाजावेत. अगदी गुलाबी करू नये. भाजताना तांदूळ आधी थोडे कालथ्याला चिकटतात आणि नंतर मोकळे होतात. 
  • ज्वारी अगदी थोडी थोडी करून medium high flame वर भाजावी. झाकण ठेऊन अधून मधून सतत ढवळावे. म्हणजे लाह्या नीट फुटतील. बाजरीही अशीच भाजावी. 
  • मूग, चणे, चणाडाळ बारीक गॅसवर वेगवेगळी भाजावी. मध्यच एखादा दाणा काढून सांडशीनी/चिमट्याने फोडून पाहावा. नीट भाजला गेला असल्यास पटकन कोरडा चुरा होतो. 
  • गहू, उडीद, धने, जिरे वेगवेगळे भाजावेत. 
  • भाजलेले सर्व जिन्नस एकत्र करून दळायला द्यावेत. गार झाले कि airtight डब्यात भरावे.

थालीपीठाची पाककृती 'भाजणीचे थालीपीठ' इथे दिली आहे. ही भाजणी करताना चणाडाळ, उडीद डाळ, धणे व जिरे जरा जास्त प्रमाणात भाजले तर हातोहात उडदाचे डांगर आणि मेतकूट बनवता येते. 

Also read -
English version of thalipeeth bhajni / multi grain flour is available at 
Thalipith Bhajani / Multi-grain flour recipe

7 comments:

Your email id will always be confidential and safe.

About Me

My photo
Eat, Meditate, Smile & Repeat.

Visitors

Popular Posts

Blog Archive

Wish to read in English? Soon, I will share the link. Keep watching this space.