Showing posts with label भजी-पकोडे. Show all posts
Showing posts with label भजी-पकोडे. Show all posts

Tags: कोबीची भजी, Cabbage bhujiya, Cabbage pakoda, 

कांदाभजी खावीशी वाटली तर कोबीची भजी उत्तम पर्याय आहे.
खाली लिहिलेली कृती नेहमीची, पाणी न वापरता केलेली आहे.
Cabbage Pakore
























पत्ता कोबीची भजी साहित्य :

बारीक आणि उभी चिरलेली कोबी 
बेसन, तेल
तिखट, मीठ, हिंग, हळद, धणेजिरे पावडर,
ओवा, बारीक चिरलेली कोथिंबीर

कोबीच्या भजीची रेसिपी : 

  • कोबीची टोके कापून उभा पातळ चिरावा. चिरल्यावर हाताने मोकळा करावा.
  • त्यात तिखट, मीठ, हिंग, हळद, धणेजिरे पावडर, ओवा, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून एकत्र करावे.
  • दहा मिनिटे तसेच ठेवल्यानंतर त्याला पाणी सुटते, या सुटलेल्या पाण्यात बसेल इतकेच बेसन त्यात हळू हळू घालत हाताने कालवीत राहावे.
  • यावर कडकडीत तेलाचे २ चमचे मोहन घालावे.
  • हातानी थोडे थोडे मिश्रण उचलून कोणताही आकार न देता तेलात तळावे. कोबी उभी चिरलेली असल्यानी भज्यांना टोके येतात.

ही भजी कधी कधी कढीत घालून कढी-पकोडे बनवता येतात.
सोबत फोडणीची ओली मिरची द्यावी.

Tags: कोबीची भजी, Cabbage bhujiya, Cabbage pakoda

Tags: Vegetable Pakode recipes in marathi, फळभाज्यांची भजी, कांदा, बटाट्याची भजी, सिमला मिरचीची भजी, वांग्याची भजी, केळ्याची भजी, घोसाळ्याची भजी, शिराळ्याची भजी, दोडक्याची भजी  Vegetable bhaji pakode, Batata Simla mirch Brinjal Banana Gourds bhaji pakodaTage

इथे भज्यांची सर्वसाधारण कृती दिलेली आहे. या पद्धतीने कोणत्याही फळभाजीची भाजी करता येतात. 
पालेभाज्यांची भजी करण्यासाठी अजून एक पोस्ट लिहिली आहे. 
फळभाज्यांची भजी - कांदा, बटाट्याची भजी, सिमला मिरचीची भजी, वांग्याची भजी, केळ्याची भजी, घोसाळ्याची भजी, शिराळ्याची भजी, दोडक्याची भजी, कोबीची भजी, फ्लॉवरची भजी अशी अनेक भजी

Kanda bhaji Kandabhaji, Onion bhaji, Pyaaj ke pakode pakora recipe in marathi

कांद्याची भजी, चहा आणि पावसाळा !! Do you really need any more explanation?? 😊 ही भजी दोन पद्धतींनी केली जातात - उभी चिरून गोल काप करून.

Tags: Green chilli Mirchi Bhaji Recipe in Marathi, mirchyanchi bhaji, talnichya mirchya talanichi mirchi, मिरच्यांची भजी, तळणीच्या मिरचीची भजी 

बरंच गोड गोड खाऊन झालं, सारखी कांद्याची बटाट्याची भजी खाल्ली की थोडा चवीत बदल म्हणून मिरच्यांची भजी खावीत. सहज बनतात आणि मुख्य म्हणजे बेसन किंवा मिरच्या उरलेल्या असतील तर करता येतात. 

साहित्य व कृती:

१. मिरच्यांच्या मधोमध उभी चीर द्यावी. देठ तोडू नये व मिरचीचे दोन तुकडेही होता कामा नयेत.
बेसन, तिखट, मीठ, हिंग, हळद, ओवा एकत्र करून पाण्यात भिजवावे. त्यात मिरच्या घोळवून तळाव्यात. 
२. भरली भाजी करताना आपण  सारण करतो ते कधी उरलेलं असतं.  हे सारण कसं बनवावं ते त्या त्या भाजीच्या रेसिपी पोस्ट मध्ये लिहिले आहे. 
 असं उरलेलं सारण मिरचीच्या पोटात भरावे आणि मग ती मिरची बेसनाच्या वर दिलेल्या मिश्रणात घोळवून तेलात तळावी. मस्त लागते. 
कोणत्याही प्रकारे करताना मिरचीच्या बिया काढू नयेत. 

Green Chilli bhajiya pakoda















Tags: Green chilli Mirchi Bhaji Recipe in Marathi, mirchyanchi bhaji, talnichya mirchya talanichi mirchi, मिरच्यांची भजी, तळणीच्या मिरचीची भजी 


Tags: Veg Bread Pakoda Pakora Bread Pattice recipe in marathi

हासुद्धा एक सहजपणे सर्वत्र उपलब्ध पदार्थ आहे. ब्रेडच्या पदार्थांशिवाय स्नॅक्स काउंटर पूर्ण होत नाही. 

साहित्य:

Tags: Bread Potali, Stuffed bread pakora, Stuffed bread pakoda recipe in marathi.

साहित्य: 

बटाटे -  भाजीसाठी

About Me

My photo
Eat, Meditate, Smile & Repeat.

Visitors

Popular Posts

Wish to read in English? Soon, I will share the link. Keep watching this space.