Tags: nachni satva for babies, balacha ahaar, baby food, balasathi nachniche satva, ragi malt in milk 

नाचणीचे सत्व घरी केलेले असल्यास केव्हाही उत्तमच. परंतु वेळेअभावी विकत आणावे लागते. बाजारात पोषकचे सकस नाचणी सत्व मिळते. साखरयुक्त आणि साखर विरहीत अशा दोन प्रकारचे असते. 
हे जरी मी लहान बाळांसाठी लिहिलेले असले तरी कोणालाही घेता येते. दूध आवडत नसेल किंवा डायबेटिस असेल किंवा सहज चवीत बदल म्हणून ताकातील नाचणी सत्व करता येते. त्याची वेगळी रेसिपी लिंकवर आहे. 

दुधातील नाचणी सत्वाचे साहित्य:

दूध - दीड कप 
साखर - १ चमचा (साखरयुक्त सत्व असल्यास जास्तीची साखर नको)

दुधातील नाचणी सत्वाची कृती:

  • एका पातेल्यात दूध घेऊन त्यात चमचाभर सत्व घालावे. 
  • गुठळ्या असतील तर मोडाव्या. सातवा दुधात विरघळणार नाही पण समान मिक्स होईल. 
  • नंतर पातेले गॅसवर ठेऊन, बारीक गॅसवर सतत ढवळत राहावे. 
  • साधारण ३-४ मिनिटांत जसजशी नाचणी शिजेल, तसतसे दीड कप दूध घट्ट होत येईल आणि एक कप राहील. 
  • ढवळणे थांबवल्यास लगेचच गुठळ्या होतात. त्यामुळे सारखं ढवळत राहिलं पाहिजे. 
हे दुधातील नाचणीचे सत्व लहान बाळांसाठी पोषक आहे. सहा महिने breastfeed केल्यानंतर द्यावयास सुरु करावे. हेच नाचणी सत्व कोणालाही घेण्यास हरकत नाही. हल्ली मिळणाऱ्या वेगवेगळ्या मिल्क मिक्स पेक्षा नाचणी सत्व कैक पटीने पुष्टीदायक आहे. 
K-Pra Ragi/ Nachni Satva with Sugar हे साखरयुक्त नाचणीसत्व अमेझॉनवर ५० रुपयात आहे.  

मधुमेही व्यक्तींना शक्यतो साखर विरहित सत्व घ्यावे. त्याची पाककृती थोडी वेगळी आहे आणि लिंकवर दिलेली आहे. रुचिपालट म्हणून तेही लहान बाळांना देता येईल.


Tags: nachni satva for babies, balacha ahaar, baby food, balasathi nachniche satva, ragi malt in milk

1 comment:

Your email id will always be confidential and safe.

About Me

My photo
Eat, Meditate, Smile & Repeat.

Visitors

Popular Posts

Wish to read in English? Soon, I will share the link. Keep watching this space.