Tags: Bread Potali, Stuffed bread pakora, Stuffed bread pakoda recipe in marathi.
साहित्य:
बटाटे - भाजीसाठीमोड आलेली कडधान्ये, टोमॅटो, कोबी, मटार, गाजर, बीट वगैरे
बेसन, तेल तिखट, मीठ, हिंग, हळद, ओवा, धनेजिरे पावडर, बारीक चिरलेली कोथिंबीर.
कृती:
बटाट्याची कोणत्याही प्रकारे केलेली भाजी घ्यावी.उकडलेल्या बटाट्याची भाजी प्रकार १, Potato Sabzi Type 1
उकडलेल्या बटाट्याची भाजी प्रकार २, Potato Sabzi Type 2
मोड आलेली कडधान्ये, टोमॅटो, कोबी, मटार, गाजर, बीट याशिवाय इतरही भाज्या घेण्यास हरकत नाही.
सर्व मिक्स करून मिरपूड घालावी. या मिश्रणाचे छोटे गोळे बनवावेत.
ब्रेडच्या एका स्लाइसला पाणी लावून हाताने दाबावे. यामुळे जास्तीचे पाणी निघून जाईल व ब्रेडला हवा तास आकार देता येईल. अशा मऊ झालेल्या स्लाइसवर भाजीचा गोळा ठेऊन त्याभोवती ती स्लाइस wrap करावी व बटव्याचा आकार द्यावा.
एका भांड्यात बेसन घेऊन त्यात तिखट, मीठ, हिंग, हळद, ओवा, धनेजिरे पावडर, बारीक चिरलेली कोथिंबीर हे सर्व घालावे. थोडे थोडे पाणी घालत गुठळ्या होऊ न देता मिश्रण भिजवावे. अगदी सैलसर नको. दाट असले पाहिजे. गरम तेलाचे २ चमचे मोहन घालावे.
हा बटवा - पोटली - या बेसन मिश्रणात घोळवून त्याच आकारात तळावा.
Bread Potali |
0 said:
Post a Comment
Your email id will always be confidential and safe.