Tags: udadache dangar, urad dal chutney, udid dalichi chatni
उडदाचे डांगर बनवून ठेवले तर पुष्कळ दिवस टिकते आणि पाहिजे तेव्हा पटकन बनवता येते. तेव्हा करण्यास फक्त दोन मिनिटे पुरेशी होतात.English version available at - Udid dangar, urad daal chatani in english
साहित्य:
उडीद डाळ - अर्धी वाटीचणा डाळ - अर्धी वाटी
धणे - ३ चमचे
जिरे - १ चमचा
तिखट, मीठ, हिंग, हळद
दही किंवा ताक
फोडणीचे सामान आणि कोथिंबीर
कृती:
- उडीद डाळ आणि चणाडाळ बारीक गॅसवर वेगवेगळी भाजून घ्यावी. उडीद डाळ पटकन काळी पडते. त्या आधीच उतरवावी. चणाडाळ भाजायला जरा वेळ लागतो. सतत ढवळून मधेच एखादा दाणा चिमट्याने किंवा बत्त्याने दाबून पाहावा. पीठ झाला कि भाजला गेला समजावे.
- धणे आणि जिरे भाजावेत.
- दोन्ही डाळी, धणे, जिरे वेगवेगळे दळावेत. नंतर एकत्र करून परत बारीक करावेत म्हणजे नीट मिक्स होतील. भरड दळावेत. बारीक पावडर नको.
- अंदाजे मीठ, हिंग, हळद घालून एकत्र करावे.
इथपर्यंत झाल्यावर हे कोरडे डांगर डब्यात भरून ठेवावे. हवे असेल तेव्हा बाउलमध्ये काढून पुढीलप्रमाणे बनवावे.
- मीठ, हिंग, हळद आधीच घातले असल्यास परत घालण्याची गरज नाही.
- दही किंवा ताकात पातळसर भिजवावे.
- त्यावर तिखट घालावे पण ढवळू नये.
- तेल + मोहरी + जिरे + हिंग फोडणी करून ती तिखटावर ओतावी.
- कोथिंबीर घालून ढवळावे.
थालीपीठाची भाजणी बनवताना दोन्ही डाळी जरा जास्त प्रमाणात भाजल्या तर डांगर लगेचच होते. त्याचवेळेला मेतकूट सुद्धा हातासरशी पटकन बनावट येते.
ही रेसिपी इंग्लिशमध्ये Udid dangar, urad daal chatani in english इथे लिहिली आहे.
ही रेसिपी इंग्लिशमध्ये Udid dangar, urad daal chatani in english इथे लिहिली आहे.
Udid dangar |
Ma'am, what's the meaning of Daangar? Is it chutney or urad Dal?
ReplyDelete