Tags: fermented idli, rice idli, idali, south indian food, इडली, तांदुळाची इडली, idli recipe in marathi
|
Rice Idli |
पीठ भिजवून आंबवून त्याच्या इडल्या करता येतात किंवा सोडा घालून इन्स्टंट इडल्या करता येतात.
थोडे आधीच ठरवून आंबवलेल्या पिठाच्या इडल्या जास्त पौष्टिक असतात.
याच आंबवलेल्या पिठापासून डोसेही करतात.
इडलीचे साहित्य :
जाडे तांदूळ - ३ वाट्या
उडीद डाळ - १ वाटी
मीठ पाणी
इडल्यांची कृती :
- जाड तांदूळ आणि उडदाची डाळ स्वच्छ धुवून वेगवेगळी भिजत टाकावी. २० तास तरी भिजवली जायला हवी.
- भिजली गेल्यावर जास्तीचे पाणी काढून टाकावे.
- ग्राईंडरमधून तांदूळ आणि डाळ वेगवेगळे बारीक करावे. मऊसूत पेस्ट झाली पाहिजे.
- उडदाची डाळ वाटताना मिक्सर मध्ये मध्ये थांबवून वाटली तर छान हलकी होते.
- पेस्ट करून झाल्यावर दोन्ही एकत्र करावे आणि परत मिक्सर मधून काढावे. यामुळे एकजीव होईल.
- हे मिश्रण मोठ्या भांड्यात झाकण लावून उबदार जागेत ठेवावे. २४ तास झाकावे.
- थंडीच्या दिवसात उशिराने आंबते. मिश्रण फुगून वर येतं त्यामुळे पातेले उंच आणि मोठे असावे.
- असे आंबलेले, फुगून वर आलेले मिश्रण ढवळून घ्यावे. ढवळताना हवेचे छोटे छोटे बुडबुडे बाहेर येतील आणि मिश्रण फाटल्यासारखे वाटेल.
- या मिश्रणात अंदाजे पाणी आणि मीठ घालावे. इडली पात्राला तेलाचा हात लावावा. आणि इडलीपीठ घालून १५ मिनिटे वाफवावे.
तांदुळाच्या ऐवजी इडली रवा घेतला तर भिजवण्याच्या आणि आंबवण्याच्या वेळ बराच कमी म्हणजे ८-९ तास इतकाच होतो. बाकी कृती सारखीच आहे.
Tags: fermented idli, rice idli, idali, south indian food, इडली, तांदुळाची इडली, idli recipe in marathi