Tags: mix vegetable soup mishra bhajyanche soup recipe in marathi

साहित्य:

१ वाटी किसलेलं गाजर 
१ वाटी बारीक चिरलेली कोबी 
१ वाटी चिरलेला टोमॅटो 
१ बटाटा 
२-३ कांद्याच्या पाती 
३ लसूण पाकळ्या ठेचून,
१ चमचा किसलेलं आलं 
५-६ मिरी 
पाव चमचा दालचिनी पूड 
१ मोठी वेलची, मीठ, लोणी
ऐच्छिक - २ चमचे चिली सॉस, ४ टेबलस्पून टोमॅटो सॉस

व्हेजिटेबल सूप कृती:

गाजर, बटाटा सोलून किसून घ्यावा. कोबी व कांद्याची पात बारीक चिरावी. 
आलं-लसूण घालून कुकरमध्ये शिजवावी. साधारण ६-७ वाट्या पाणी घालावे. 
त्यातच काळी मिरी, दालचिनी, वेलची घालून वाफ येऊ द्यावी. उकळल्यावर गाळावे. 
ह्या शिजून मऊ झालेल्या भाज्या मिक्सर मधून एकजीव करून या सूपला लावल्यास जास्त घट्ट व चवदार होईल. गरम सूपात लोणी व मीठ घाला. 
आवडत असल्यास चिली सॉस, टोमॅटो सॉस घालावा.





Tags: mix vegetable soup mishra bhajyanche soup recipe in marathi

0 said:

Post a Comment

Your email id will always be confidential and safe.

About Me

My photo
Eat, Meditate, Smile & Repeat.

Visitors

Popular Posts

Blog Archive

Wish to read in English? Soon, I will share the link. Keep watching this space.