Tags: Diwali faral, bhajanichi chakali chakalichi bhajani recipe in marathi, चकलीची सोपी भाजणी
चकली भाजणीसाठी लागणारे साहित्य:
तांदूळ - ४ वाट्याचणाडाळ - २ वाट्या
उडीद डाळ - १ वाटी
फक्त जिरे - १ मूठ
पोहे (जाड बारीक कोणतेही) + मूगडाळ - मिळून १ वाटी
भरपूर तेल, ओवा, पाणी, मीठ, तीळ, तिखट, हळद, हिंग
भाजणीच्या चकलीची रेसिपी - कृती:
- तांदूळ, चणाडाळ, उडीद डाळ, मूगडाळ वेगवेगळे भिजवून वाळवावे.
- हे सर्व वेगवेगळे भाजावेत. मूठशेक भाजावेत. खमंग अजिबात भाजू नये कारण नंतर चकली तळायची असते.
- भिजवायचे नसतील तर थेट भाजले तरी चालतात.
- भाजल्यावर त्याचे ग्राईंडरमधून बारीक चूर्ण करावे. ही भाजणी तयार झाली.
- तीळ ओवाही थोडा भाजून घ्यावा.
- जितक्या वाट्या भाजणी घ्याची असेल, तितक्याच वाट्या पाणी उकळण्यास ठेवावे.
- त्या पाण्यात २ चमचे तेल, तीळ, ओवा, हिंग, हळद, तिखट मीठ घाला.
- पाणी उकळले कि गॅस बंद करून त्यात भाजणी घाला.
- वरून कडकडीत तेलाचे मोहन घालून भरपूर मळून घ्या. ही उकड थंड व कडक होता काम नये.
- लागेल तेवढी उकड चकलीच्या साच्यात घ्या व बाकीची झाकून ठेवा.
- प्लास्टिक पेपरवर चकल्या पडून कडकडीत गरम केलेल्या तेलात, मंद आचेवर, तळा.
- गॅस मोठा असेल तर त्या जळतील.
Diwali Chakli bhajani information is correct. Thank you.
ReplyDelete