Tags: Amiri khaman recipe in marathi, खमण कसे करावे, ढोकळा, dhokla
३० मिनिटे - ६-८ जणांसाठीसाहित्य:
चणाडाळ - १ कपखाण्याचा सोडा - पाव चमचा
लिंबूरस - ३ चमचे
बारीक साखर - २ चमचे
चवीला मीठ, ४ चमचे तेल, फोडणीसाठी मोहरी व हळद
आलं-हिरव्या मिरच्या-लसूण पेस्ट, शेव, कोथिंबीर
अमीरी खमण रेसिपी :
चणाडाळ ६-७ तास भिजत घालावी. (इन्स्टंट करायचे असल्यास बेसन घ्यावे.)थोड्या जिऱ्यासोबत बारीक वाटावी.
डाळीत मीठ व सोडा घालून खूप फेसावे. थोडे पाणी घालून लिबलिबीत करून २-३ तास ठेवावे.
एका लंगडीला सर्व बाजूंनी तेल लावावे.
मिश्रण त्यात टाकून मोदक पात्रात किंवा बिनशिट्टीच्या कुकरमध्ये १५ मिनिटे वाफवावे.
गार झाल्यावर ते घट्ट मिश्रण किसणीवर किसावे.
२-३ चमचे पाण्यात आलं-हिरव्या मिरच्या-लसूण पेस्ट, चवीपुरते मीठ, लिंबूरस, बारीक साखर हे सर्व मिक्स करून ते पाणी किसाला लावावे.
तेलाची फोडणी करून ती किसावर ओतावी. शेव, कोथिंबीर सजवून खावे.
0 said:
Post a Comment
Your email id will always be confidential and safe.