Tags: Pulao, Veg biryani, Vegetable rice recipes, Kashmiri Pulav Rice recipe in marathi, भाताचे प्रकार 

साहित्य:

बासमती तांदूळ - पाव किलो 

गाजर, मटार, १ टोमॅटो, लिंबू

अननस, चेरी, सफरचंद, डाळिंब, टूटीफ्रूटी - असेल ते आवडेल ते 
२ तमालपत्र 
२ मोठी वेलची 
काजूचे अर्धे केलेले तुकडे
१ मोठा चमचा तूप 
किंचित लाल किंवा केशरी रंग - बीटाचे पाणीही चालेल. 
वाटण्याचा मसाला - 
२ मध्यम कांदे, ४ लसूण पाकळ्या 
अर्धी वाटी पुदिना, आलं, 
बडीशेप व शहाजिरे - प्रत्येकी १/२ चमचा 
धणे, ३-४ लवंग, ४ मिरी,
२ दालचिनी तुकडे 
५ काश्मिरी लाल मिरच्या 
तेल 

कृती:

साधारण अर्धा तास आधी तांदूळ धुवून ठेवावेत. करते वेळी तांदुळाला मीठ लिंबू लावावे. 
टोमॅटोची प्युरी करावी. 
गाजर किसावे किंवा त्याचे पातळ तुकडे करावेत. 
अननस, चेरी, सफरचंद, डाळिंब, टूटीफ्रूटी किंवा द्राक्षे यापैकी जे असेल ते किंवा जे आवडेल ते घालता येईल. आधी धुवून कोरडे करून ठेवावे. 
पातेल्यात गरम तुपावर मोठी वेलची व तमालपत्र घालून परतावे. मटार, गाजर, तांदूळ घालून परतावे. 
वाटणाचा मसाला वाटून घ्यावा. एका दुसऱ्या पातेल्यात तेलावर हा मसाला परतून घ्यावा व टोमॅटोची प्युरी परतून घ्यावी. थोडे मीठ घालावे. 
फळांचे तुकडे करून थोड्या तुपात हलके परतावे. 
उभा चिरलेला कांदा तेलात गुलाबी रंगावर तळावा. काजूही गुलाबी तळावेत. 
फडफडीत शिजलेला भात मोकळा करून त्याला हलक्या हाताने खाण्याचा रंग लावावा. 
रंग नको असल्यास, भात शिजवताना त्यात बीटाचे पाणी घालावे. 
या मोकळ्या भातावर मसाला व फळे एकत्र करावीत. कोथिंबीर घालावी. 
भट सुटा राहिला पाहिजे असे ढवळावे.



Tags: Pulao, Veg biryani, Vegetable rice recipes, Kashmiri Pulav Rice recipe in marathi, भाताचे प्रकार 

0 said:

Post a Comment

Your email id will always be confidential and safe.

About Me

My photo
Eat, Meditate, Smile & Repeat.

Visitors

Popular Posts

Blog Archive

Wish to read in English? Soon, I will share the link. Keep watching this space.