Tags: kadu nasleli karli karlyachi bhaji, karlyacha kadupan kasa ghalvava, bitterness of bittergourd, how to reduce bitterness of karela bittergourd

जगाच्या पाठीवर कुठेही 'कडू' चवीचं उदाहरण म्हणून कारलं हेच अगदी लहानपणापासूनच सांगितलं जातं. इंग्रजीमध्ये तर सरळ बिटरगार्ड म्हटलं आहे.
कडुपणामुळे काहीजण कारली खात नाहीत. दया येते मला त्यांची. इतकी सुंदर भाजी, अगदी सहज उगवणारी, कोणत्याही मातीत रुजणारी, शिवाय औषधी गुणांनी पुरेपूर! पण फक्त कडू चवीची म्हणून बरेच तिला judge करतात, It's absolutely wrong to judge a book by its cover.

कारल्याच्या भाज्या अगणित प्रकारे करता येतात. प्रत्येक प्रकरणी केलेली भाजी उत्तमच लागते.
इथे क्लिक करून कारल्याच्या भाजीची रेसिपी पहा.
शिवाय कारल्याच्या बियांची चटणी करता येते आणि तीसुद्धा छान लागते.

बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो कि कारल्याचा कडूपणा कसा जाईल


कशासाठी घालवायचा कडूपणा?
नैसर्गिकपणे कोणत्याही भाजीची जी चव असते ती शक्यतो बदलू नये. आपली आवड निवड broad करावी.

कारल्याच्या कडवटपणा काढून टाकण्याचे बरेच मार्ग आहेत. सर्वात प्रचलित मार्ग म्हणजे कारल्याला मीठ लावून ठेवणे.
सर्वात आधी चाकू किंवा चमच्याने हलकेच कारल्याची टोके काढून टाकावीत. जे हिरवे, खवल्यांसारखे भाग असतात ते काढावेत.
आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने कारले चिरावे.
चिरलेले कारल्याला मीठ चोळावे आणि एका पातेल्यात तासभर झाकून ठेवावे.
थोड्यावेळाने त्यांना पाणी सुटते. नंतर हाताने दाबून पाणी काढून टाकावे.


काहीजण कारल्याला मीठ लावून एका स्वच्छ फडक्यात गुंडाळतात. आणि त्यावर जड वजन ठेवतात.
यामुळे सुटलेलं पाणी लगेच निघून जाते.  पण या प्रकारात वजन ठेवल्याने चिरलेल्या कारल्याचा आकार बदलतो.

याशिवाय अजून एका प्रकारे कारली कमी कडू लागतात. पाणी गरम करावे. त्यात मीठ घालावे आणि चिरलेले कारले त्यात टाकून उकळावे. उकळताना झाकण ठेवलेच पाहिजे कारण त्यामुळे कडूपणा बराच कमी होतो.
५ मिनिटे उकळले तरी पुरेसे आहे. कारण कारली नंतर भाजी करताना परत शिजणारच असतात.
उकळल्यावर तसेच थोडावेळ झाकून ठेवावे.

दह्यात कारली भिजवून ठेवणे, लिंबाच्या रसात ठेवणे यामुळेदेखील कारल्याचा कडवटपणा दूर होतो.


या बहुतेक सर्व प्रकारांमध्ये मीठ लावणे compulsory आहे. या मिठाचा अंदाज घेऊनच भाजी करताना मिठाचे प्रमाण ठरवावे.

कारल्याची परतलेली भाजी किंवा कारल्याच्या काचऱ्या करायच्या असतील तर कडवटपणा घालवण्यासाठी काहीही करण्याची मुळीच गरज नाही. नीट व्यवस्थित परतली कि भाजी अजिबात कडू होत नाही. 




Tags: kadu nasleli karli karlyachi bhaji, karlyacha kadupan kasa ghalvava, bitterness of bittergourd


0 said:

Post a Comment

Your email id will always be confidential and safe.

About Me

My photo
Eat, Meditate, Smile & Repeat.

Visitors

Popular Posts

Wish to read in English? Soon, I will share the link. Keep watching this space.