Tags: Sevaiyya Vermicelli Shevaya upama upma recipe in marathi
१५ मिनिटे - ४ जणांसाठीसाहित्य:
२०० ग्रॅ शेवया (हत्तीछाप)१/४ कप काजू तुकडे
५ हिरव्या मिरच्या कमी तिखट
१/४ कप बारीक चिरलेली कोथिंबीर
मीठ, साखर, लिंबूरस, तेल, जरासं पाणी, ओलं खोबरं, हळद (optional)
शेवयांच्या उपम्याची कृती:
शेवयांचे एक इंची तुकडे करावेत. चुरा नको. हिरव्या मिरच्यांचे तुकडे करावेत.
पातेल्यात थोडे तेल घालून शेवया बदामी रंगावर परताव्यात.
त्याच तेलात काजूही बदामी टाळावेत.
पसरट भांड्यात तेल घेऊन नेहमीची फोडणी करावी व मिरच्या घालाव्या.
हळद घातल्यास पिवळा उपमा होईल म्हणून आवडीप्रमाणे घालावी किंवा घालू नये.
मीठ टाकून शेवया व काजू घालावेत. हळूवार परतावे.
पाणी शिंपडून झाकण ठेऊन वाफ आणावी. असे साधारण सर्व पाणी उडून जाईपर्यंत करावे.
आवडीप्रमाणे साखर घालावी. एक वाफ आणून लिंबू पिळून हलकेच एकत्र करावे.
शेवया गोळा होता काम नयेत, शिजल्या पाहिजेत व सुट्या राहिल्या पाहिजेत.
0 said:
Post a Comment
Your email id will always be confidential and safe.