Khandatoli khandtoli recipe in marathi
साहित्य:
जुना तांदूळ - अर्धा किलोओल्या नारळाची १ वाटी
चवीप्रमाणे गूळ
किंचित मीठ, काजूचे तुकडे, थोड्या खोबऱ्याचे काप, तूप, वेलची पूड
कृती:
तांदूळ धुवून वाळवून रवा काढावा. (भरड दळावे.)असा २ वाट्या रवा घेतल्यास ४ वाट्या पाणी उकळण्यास ठेवावं.
नारळ खोवून बारीक वाटून घ्यावा. गूळ किसावा.
पाणी उकळले कि त्यात वाटलेल्या नारळाचा गोळा व चवीप्रमाणे गूळ व किंचित मीठ घालावे.
गूळ विरघळला कि त्यात काजू खोबऱ्याचे काप व केलेला रवा घालावा.
मंद गॅस वर ढवळत राहावे. शिजून गोळा होत आला कि वेलची पूड घालून खाली उतरवावे.
तूप लावलेल्या थाळीत हे मिश्रण ओतून सामान पसरवावे. थंड झाले कि वड्या कापाव्या.
लोणकढ्या तुपाबरोबर खाव्यात.
0 said:
Post a Comment
Your email id will always be confidential and safe.