Tags: jwariche dhirade, jwariche ghavan, jwarichi amboli, jowar pancake, jowar recipes in marathi
५ मिनिटे - मिश्रण करण्यास
१ मिनिट - घावन करण्यास
ज्वारीच्या धिरड्याचे साहित्य :
ज्वारीचे पीठ - १ वाटी
बारीक रवा - १ चमचा
दही - १ चमचा (नसलं तरी चालेल)
तिखट मीठ हिंग
आलं लसूण कोथिंबीर तेल
ज्वारीचे घावन करण्याची कृती :
- ज्वारीचे किंवा ज्वारीच्या लाह्यांचे पीठ मोठ्या वाडग्यात घ्यावे.
- त्यात एक चमचा बारीक रवा, अंदाजानुसार तिखट, मीठ, हिंग आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.
- दही आणि तांदूळ पिठी असल्यास घालावे.
- लसणीच्या ७-८ पाकळ्या आणि आलं एकत्र ठेचून तो ठेचा घालावा. चव चांगली येते.
- सर्व एकत्र करून त्यात हळू हळू पाणी ओतत मिक्स करावे. गुठळ्या होऊ देऊ नयेत. डोसा करतो त्यापेक्षा किंचित पातळ मिश्रण घावनासाठी लागते.
- आवडीप्रमाणे बारीक चिरलेल्या मिरच्या, कांदा, ओवा घातला तरी चालेल. हळदीने रंग थोडा बदलतो म्हणून मी नाही घालत.
- मिश्रण तयार झाला कि त्यात चमचाभर तेल घालावे.
- गरम नॉनस्टिक तव्यावर पळीने गोलाकार मिश्रण ओतावे. डोशासारखे पसरवू नये. झाकण ठेऊन १ मिनिट शिजू द्यावे. नंतर उलटवून झाकण न ठेवता दुसऱ्या बाजूनेही शिजू द्यावे.
Jwariche ghavan |
0 said:
Post a Comment
Your email id will always be confidential and safe.