Tags: how to make metkut at home, metkoot recipe in marathi
घरी सहज उपलब्ध असणाऱ्या धान्यांपासून सहज बनावट येणारी ही एक कोरडी चटणी आहे. पूर्वीच्या काळी सकाळच्या न्याहारीचे लोकल ठराविकच पदार्थ होते; त्यापैकी एक मेतकूट!
मेतकूट उत्तम appetizer आहे. मऊ भात, तूप आणि मेतकूट गरम गरम खाल्ल्याने अग्निदीपन होते आणि दुपारच्या जेवणापर्यंत कडकडून भूक लागते.
इंग्लिशमध्ये वाचण्यासाठी Metkut recipe in English इथे क्लिक करा.
इंग्लिशमध्ये वाचण्यासाठी Metkut recipe in English इथे क्लिक करा.
साहित्य:
चणाडाळ - १ वाटी
उडीद डाळ - अर्धी वाटी
तांदूळ - अर्धी वाटी
गहू - २ मोठे चमचे
मेथी दाणे - १०
धणे, जिरे - पाव वाटी मिळून
काळीमिरी - १०
तिखट, मीठ, हिंग, हळद,
कृती:
- साहित्यातील प्रत्येक गोष्ट (चणाडाळीपासून मिरीपर्यंत) कोरडीच वेगवेगळी भाजून घ्यावी.
- खमंग भाजावे पण जाळू नये.
- प्रमाण कमी असल्यास भाजलेल्या सगळ्या गोष्टी आणि तिखट, मीठ, हिंग, हळद मिक्सरमधे बारीक वाटून घ्याव्या.
- मेतकूटाचा रंग सहसा पिवळा असतो, त्यामुळे हळदीचे प्रमाण वाढवावे.
- बारीक करत असताना मधेच चव घेऊन तिखटमिठाचा अंदाज घ्यावा. तिखट कमी पडल्यास शक्यतो मिरपूडच वापरावी.
मेतकूट घालून पोहे करता येतात. चिवड्यातसुद्धा चविष्ट लागते.
थालीपीठाची भाजणी करताना हातासरशी हे मेतकूट आणि उडदाचं डांगर या दोन्ही भाजक्या गोष्टी करता येतात.
गरम मऊ भात, साजूक तूप आणि मेतकूट... किंवा भात, सायीचं दही आणि मेतकूट... :)
कमी पदार्थ वापरून चविष्ट मेतकुट.
ReplyDeleteThank you Digambar Joshi for appreciating the Metkoot recipe
Deletekhup chan
ReplyDeleteMetkut karun paha. Metkoot appetizer aahe. Thnk u
ReplyDelete