Bharli Bhendi or Stuffed Lady Finger recipe in Marathi

भरल्या भेंड्यांचा रंग हिरवाच ठेवायचा असेल तर शक्यतो भेंडी भरून ग्रील करावी. कढईत थोडा रंग बदलतो. 

साहित्य:


मध्यम आकाराची ताजी भेंडी 
टोमॅटो 
दाण्याचं कूट 
तिखट
गरम मसाला, मिरीपूड, कोथिंबीर
कांदा किंवा लसूणपेक्षा हिरवी लसूण व पातीचा कांदा वापरावा.

कृती:

भेंडी धुवून कोरडी करून घ्यावीत. त्यांचे देठ कापून टाकावे. 
भेंडीच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत उभी चीर द्यावी. परंतु शेवटपर्यंत कापू नये. तुकडे नाही झाले पाहिजेत. मग या चिरलेला Perpendicular अशी चीर दुसऱ्या टोकाकडून द्यावी पण शेवटपर्यंत चिरू नये. 
भेंडे अख्ख राहिला पाहिजे. 
दाण्याच्या कूटात तिखट, मीठ, हिंग, हळद, गरम मसाला, जिरेपूड, जरासा ओवा घालावा. कधीकधी बदल म्हणून ओलं खोबरं घातलं तरी छान लागतं. 
हे मिश्रण भेंडीला दिलेल्या चिरांमध्ये भरावं.
ओव्हनमध्ये १० मिनिटे ग्रील केल्यास भेंडी शिजतात आणि रंग हिरवाच राहतो. भेंडीला थोडं तेल लावून मग ग्रील करावे. ग्रील नसेल तरी गॅसवर करता येते पण रंग जरा काळपट होतो. 
एका कढईत तेल घेऊन नेहमीची फोडणी करावी आणि त्यात टोमॅटो घालावेत. कांदा किंवा लसूणपेक्षा हिरवी लसूण व पातीचा कांदा फोडणीत वापरावा.
टोमॅटो थोडेसे शिजू लागल्यावर ग्रील केलेली भेंडी (नसतील केली तर कच्चीच) टाकावीत. 
व्यवस्थित परतावेत. परतत राहिल्याने काळी पडत नाहीत; पण भेंडी तुटणार नाहीत याची काळजी घ्यावी. 
बारीक चिरलेल्या कोथिंबिरीने सजवावे. 

0 said:

Post a Comment

Your email id will always be confidential and safe.

About Me

My photo
Eat, Meditate, Smile & Repeat.

Visitors

Popular Posts

Blog Archive

Wish to read in English? Soon, I will share the link. Keep watching this space.