Tags: khamang Kakdi koshimbir Cucumber raita for fast upvas recipe in marathi, उपासाची कोशिंबीर , खमंग काकडी, उपवासाची कोशिंबीर, काकडीची कोशिंबीर
५ मिनिटे - ४ माणसांसाठीउपासाची काकडी कोशिंबीर साहित्य:
ताज्या गोड काकड्या - ४-५दाण्याचं कूट - २ चमचे किंवा ओलं खोबरं
हिरव्या मिरच्या - १-२
जरासा चिंचेचा कोळ
मीठ साखर तूप जिरे हिंग
उपासाच्या कोशिंबीची कृती:
साल काढून काकड्या चोचवून घाव्यात.त्यात दाण्याचं कूट किंवा ओलं खोबरं, जरासा चिंचेचा कोळ घालावा.
आवडत असल्यास कमी तिखट हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. सगळ्यात शेवटी मीठ साखर घालावे.
नीट ढवळावे.
उपवासासाठी करायची झाल्यास तूप जिरे मिरचीची फोडणी वरून घालावी.
उपवास नसेल तर त्या फोडणीत हिंग घालावा.
चिंचेच्या ऐवजी दही सुद्धा घालता येतं.
0 said:
Post a Comment
Your email id will always be confidential and safe.