Tags: bharli vangi vangyachi bhaji subji stuffed brinjals sabzi eggplant bharva baingan recipe in marathi
भरली वांगी मी दोन पद्धतीने देत आहे. पहिला प्रकार आधी वाचलाच असेल. इथे दुसरा प्रकार देत आहेत. या प्रकारची भाजी तिखट व चमचमीत आहे.Stuffed Brinjal veg |
वांगी ताजी, लहान आकाराची व बिया कमी असलेली निवडावीत. चिरण्याच्या २ पद्धती आहेत. एक पद्धत या रेसिपीमध्ये आणि दुसरी प्रकार १ च्या रेसिपी मध्ये दिलेली आहे. सोयीप्रमाणे कोणतीही वापरू शकता. काहीजणं वांग्यांची देठं काढत नाहीत तर काही काढतात. खाली दिलेल्या चिरण्याच्या पद्धतीत देठे नाही काढत.
भरल्या वांग्याच्या भाजीचे साहित्य:
लहान आकाराची वांगी - माणशी ३
दाण्याचं कूट,
दाण्याचं कूट,
थोडं तिळाचं कूट
गरम मसाला
गरम मसाला
कांदा, लसूण
तिखट, तेल
कोथिंबीर
तिखट, तेल
कोथिंबीर
भरली वांग्याच्या भाजीची कृती:
- वांगी धुवून देठाचा फक्त काळा झालेला भाग कापावा. पूर्ण देठ कापू नये. समोरील भागाकडून देठापर्यंत एक चीर द्यावी. त्याच बाजूने या चीरेला perpendicular दुसरी चीर द्यावी. + चा आकार होईल व वांगे ४ पाकळ्यांच्या फुलासारखे दिसेल.
- एका पातेल्यात वांगी बुडतील इतके साधे पाणी घेऊन ही चिरलेली वांगी त्यात ठेवावीत. यामुळे वांग्यांचा राब जातो व उग्र लागत नाहीत.
- कांदा चिरावा. शक्यतो कांद्याची ग्राईंडरमध्ये पेस्ट करून घ्यावी.
- लसूण ५-६ पाकळ्या व आल्याची पेस्ट करावी.
- एका प्लेट किंवा वाडग्यात दाण्याचे कूट घ्यावे. त्यात थोडं तिळाचं कूट, तिखट, मीठ, हिंग, हळद, गरम मसाला घालावा. हे कोरडे सारण झाले.
- एव्हाना वांग्यांचा राब गेला असेल, पाणी पिवळे झालेले असेल. वांगी बाहेर काढून झटकावीत.
- वांग्यांच्या दोन्ही बाजूंच्या चिरांमध्ये हलक्या हाताने सारण भरावे. सारण भरताना वांगी अखंडच राहिली पाहिजेत.
- कढईत भरपूर तेल घ्यावे. त्यात मोहरी तडतडावी. आलं लसूणची पेस्ट फोडणीत घालावी व जरा परतावे. कांद्याची प्युरी घालून परतावे. हिंग, हळद, भरपूर तिखट घालावे. सतत ढवळत राहावे.
- तिखट घातलं की त्यातच चिमूटभर साखर घालावी. त्यामुळे भाजीवर तेलाचा मस्त लाल तवंग येतो.
- नंतर गरम मसाला घालावा. नुसता गरम मसाला पुरेसा आहे. पण बाजारात केप्रचा शेवभाजी मसाला मिळतो. गरम मसाल्यासोबत थोडा तो टाकला तरी चालतो.
- यावर भरलेली वांगी सोडावीत व हळुवारपणे ढवळावीत. वांग्यांच्या सर्व बाजूंना फोडणी लागली पाहिजे. पाणी न घालता माध्यम किंवा बारीक गॅसवर १-२ मिनिटे झाकून ठेवावे.
- नंतर थोडे थोडे पाणी घालून ढवळावे. मीठ घालावे. झाकण ठेऊन नीट शिजू द्यावीत.
- सारण उरले असेल तर वांगी शिजल्यावर वरूनच भाजीत घालावे. दाण्याच्या कुटामुळे ग्रेव्ही घट्ट होईल. वांगी मऊ होतील. कोथिंबीर घालून सजवावे
आपला अभिप्राय, मते आणि सुधारणा समजल्यास पुढील रेसिपी चांगल्या प्रकारे लिहिता येईल.
कमेंटमधे जरूर कळवावे.
0 said:
Post a Comment
Your email id will always be confidential and safe.