Tags: Panipuri Golgappe Gupchup recipe in marathi mumbai chat street food

कितीही खाल्लं तरी अजून हवीहवीशी वाटणारी गोष्ट म्हणजे पाणीपुरी !!

साहित्य:

पाणीपुरीच्या पुऱ्या 
रगडा किंवा मूग बटाटा
खारी बूंदी 
पुदिन्याची तिखट चटणी
आवडीप्रमाणे कांदा कोथिंबीर 

कृती:

  • पाणीपुरीच्या पुऱ्या विकतच आणलेल्या बऱ्या. 
  • काही ठिकाणी चपट्या पुऱ्या मिळतात. त्या फक्त घरी तळायच्या; कि फुगून नेहमीच्या पुऱ्या होतात. 
  • संपूर्ण घरी करायच्या असतील तर मैदा व बारीक रवा, मीठ व खायचा सोडा घालून घट्ट भिजवावे. लहान पुऱ्या लाटून भरपूर तेलात तळावे. हे भिजवलेले पीठ कोरडे पडून देऊ नये. तेल व्यवस्थित तापले असेल तर पुऱ्या टपोऱ्याफुगतात व खुसखुशीत राहतात. काही कारणाने अगदीच मऊ पडल्या तर ओव्हन मध्ये बेक करून घ्याव्या. 
  • मोड आलेले मूग उकडून घ्यावे; किंचित मीठ घालावे.
  • बटाटे मऊ उकडून साले काढून मॅश करावे व किंचित मीठ घालावे.
  • मूग+बटाट्याऐवजी वाटाण्याचा रगडा करूनही वापरता येतो. अजून टेस्टी लागतो.
  • तिखट पाणी आणि गोड पाणी बनवावे.
पाणीपुरी कशी खावी याबद्दल अजून काही सांगण्याची आवश्यकता वाटत नाही.. ☺😋
Panipuri Pani puri golgappe gupchup mumbai street food Bombay chat
Panipuri
बनवली की कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली ते.





1 comment:

Your email id will always be confidential and safe.

About Me

My photo
Eat, Meditate, Smile & Repeat.

Visitors

Popular Posts

Blog Archive

Wish to read in English? Soon, I will share the link. Keep watching this space.