Tags: Veg Bread Pakoda Pakora Bread Pattice recipe in marathi
हासुद्धा एक सहजपणे सर्वत्र उपलब्ध पदार्थ आहे. ब्रेडच्या पदार्थांशिवाय स्नॅक्स काउंटर पूर्ण होत नाही.साहित्य:
बटाटे - उकडून भाजीब्रेड, बेसन, तेल
तिखट, मीठ, हिंग, हळद, ओवा, धनेजिरे पावडर, बारीक चिरलेली कोथिंबीर.
ब्रेड पकोडा कृती:
बटाट्याची भाजी करून घ्यावी. ही भाजी खाली दिलेल्या २ प्रकारे करता येते.उकडलेल्या बटाट्याची भाजी प्रकार १, Potato Sabzi Type 1
उकडलेल्या बटाट्याची भाजी प्रकार २, Potato Sabzi Type 2
बटाट्याच्या भाजीऐवजी कोणतीही कोरडी भाजी सॅन्डविचमध्ये भरली तरी चालते.
एका भांड्यात बेसन घेऊन त्यात तिखट, मीठ, हिंग, हळद, ओवा, धनेजिरे पावडर, बारीक चिरलेली कोथिंबीर हे सर्व घालावे.
थोडे थोडे पाणी घालत गुठळ्या होऊ न देता मिश्रण भिजवावे. अगदी सैलसर नको. दाट असले पाहिजे.
गरम तेलाचे २ चमचे मोहन घालावे.
ब्रेडच्या कांदा चाकूने कापून घ्यावात. आत बटर लावावे व भाजीचा थर द्यावा.
या चौकोनी सॅन्डविचचे सुरीने डायगोनली कापून दोन त्रिकोणी तुकडे करावेत.
या ब्रेडना आतमधून कोणतीही कोरडी चटणी लावली तरी मस्त स्वाद येतो.
प्रत्येक त्रिकोणाच्या कडा घट्ट दाबून हे सँडविच बेसनाच्या मिश्रणात घोळवावें.
तेलात सोनेरी रंग होईपर्यंत तळावे.
Bread Pakoda, Bread Pattice |
0 said:
Post a Comment
Your email id will always be confidential and safe.