Chatni Chatani Chutney for Idli dosa uttapa recipe in marathi

करण्यास सोपी व चवदार. अशी चटणी जास्त तिखट नसते.

साहित्य:


डाळं - अर्धी वाटी 
उडदाची डाळ - पाव वाटी
लाल मिरच्या - ३-४
ओला खोबरं - अर्धी वाटी 
मीठ, फोडणीचं सामान 

कृती:

छोट्या कढल्यात डाळं, उडीद डाळ व सुक्या लाल मिरच्या एकत्रित नुसत्याच भाजून घ्याव्यात. 
ग्राईंडरमध्ये त्यांचे चूर्ण करावे. ओलं खोबरं, मीठ घालून परत फिरवावे. 
लागेल तसे पाणी घालून चटणी करावी. ही पातळसर असते. एका बाउलमधे काढावी. 
कढल्यात तेल तापवून त्यात मोहरी, जिरं, थोडा जास्त हिंग घालून फोडणी करावी. 
हळद घालू नये व तिखटही घालू नये. 
तिखटाऐवजी २-३ सुक्या लाल मिरच्या तेलात टाकाव्यात.
मिरच्या जरा तळल्या गेल्यावर बाऊलमधल्या चटणीवर ओतावी. ढवळावी. 
फोडणी न घालतासुद्धा वापरता येते. 
या तळलेल्या मिरच्या नुसत्या खायला ही चांगल्या वाटतात. 
कोणत्याही प्रकारच्या इडलीबरोबर खाता येते.
Chutney for idli with seasoning
Chutney for idli without seasoning



0 said:

Post a Comment

Your email id will always be confidential and safe.

About Me

My photo
Eat, Meditate, Smile & Repeat.

Visitors

Popular Posts

Blog Archive

Wish to read in English? Soon, I will share the link. Keep watching this space.