Tags: Boiled potato vegetable aloo sabzi batata bhaji recipe in marathi aalo ki sabji, आलू सब्जी
ही भाजी २ प्रकारे बनवता येते. खालील प्रकार हा सर्वात सोपा, रुटीन प्रकार आहे. प्रकार २ थोडा वेगळा आहे.
साहित्य:
४ मध्यम बटाटे
२ मध्यम कांदे
आलं, ५-६ लसूण पाकळ्या, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, लिंबू, कोथिंबीर
बटाट्याची भाजी कृती:
बटाटे धुवून कूकरमध्ये उकडावेत. पूर्ण उकडावेत.
कांदा बारीक चिरावा.
एका कढईत तेल गरम करण्यास ठेवावे. तेल कंजुषपणे घेऊ नये.
तेल गरम होईस्तोवर साले काढावीत.
गरम तेलात मोहरी तडतडली की मिरच्या, कढीपत्ता, आलं, लसूण घालावा. जरा परतल्यावर कांदा घालावा.
कांदा हलका गुलाबी होईस्तोवर बटाटे हाताने कुस्करावेत. चिरू नये, मॅश केलेले चांगले लागतात.
त्या बटाट्यावर मीठ, चिमूटभर साखर, चिरलेली कोथिंबीर, धणेजिरे पावडर, किंचित हिंग, चमचाभर हळद आणि अर्ध्या लिंबाचा रस घालून मिश्रण हातानी कालवावे. Available असल्यास फोडणीत मटार घालावी.
हे मिश्रण कढईत घालून व्यवस्थित ढवळावे.
१५ मिनिटात बटाटे शिजतात. आणि भाजी अगदी २ मिनिटांत होते. प्रवासाला नेण्यास उपयुक्त आहे.
ह्या भाजीचा वापर करून बटाटेवडे,
टोस्ट सँडविच,
व्हेज ब्रेड पकोडे,
ब्रेड पोटली,
आलू पराठा असे पदार्थ बनवता येतात. पोळी, पुरी सोबत ही भाजी छान लागते.
ही भाजी अजून जरा वेगळी बनवता येते, थोडी रंगीत आणि थोडी जास्त पौष्टिक. रेसिपी इथे दिलेली आहे -
उकडलेल्या बटाट्याची भाजी प्रकार २, Potato Sabzi Type 2
उकडलेले बटाटे फ्रिजमध्ये टिकतात. आयत्या वेळेला ग्रेव्ही दाट करण्यासाठी, भाजी किंवा वडे करण्यासाठी पटकन कामी येतात.
Tags: Boiled potato vegetable aloo sabzi batata bhaji recipe in marathi aalo ki sabji, आलू सब्जी
Related Posts:
उकडलेल्या बटाट्याची भाजी प्रकार २, Potato Sabzi Type 2
Tags: Boiled potato vegetable aloo sabzi batata bhaji recipe in marathi,उकडलेल्या बटाट्याची भाजी, आलू सब्जी
ही भाजी २ प्रकारे बनवता येते. खालील प्रकार हा जरा जास्त रंगीत आहे.
या आधी लिहिलेला प्रकार १ नेहमीचा आहे.
… Read More
वांग्याचे भरीत, बैंगन भरता Vangyache Bharit, Baigan Bharta
Tags: Vangyache bharit, bengan bharta, vaangyach bharit kasa karava, bhartache vange, वांग्याचं भरीत, bhareet
वांगी बऱ्याच प्रकारची मिळतात. त्यापैकी भरताचे वांगे हे आकाराने सर्वात मोठे असते. काहीजण याची भरताची वांगी उ… Read More
उपवासाची बटाट्याची भाजी, जीरा आलू, Potato subji for fast
Tags: Upvasachi bhaji, upasachi batatyachi bhaji, aalo ki sabji vrat ke liye, उपवासाची बटाट्याची भाजी, जीरा आलू, आलू जिरा, aaloo jira, aloo jeera, उपासाची बटाटा भाजी,
उपासाची बटाटा भाजी (कोरडी) बहुतेक सर्व घ… Read More
कारल्याची भाजी, करेला फ्राय, (परतवून सुकी भाजी) Karela Fry
Tags : Karela ki sabji, karalyachi bhaji, karlyache kaap, karela fry, bittergourd subzi, कारली, karalyachya kacharya kachrya, karla
कारल्याची परतून केलेली भाजी अजिबात कडू लागत नाही. कारल्याचा कडवटपणा निघून जाण्या… Read More
कारलं आणि शेंगदाण्याचं कूट भाजी, Karlyachi Bhaji, Bittergourd with Peanut Powder
चमच्याने Tags: कारल्याची दाण्याचं कूट घालून केलेली भाजी, कारल्याच्या काचऱ्या, karele ki sabzi, karlyachi bhaji, karla, bittergourd vegetable, karla and danyache kut
परतवलेल्या भाजीप्रमाणे कारल्याची शेंगदाण्याचे कूट घालून क… Read More
0 said:
Post a Comment
Your email id will always be confidential and safe.