Tags: Vadapav Batata Vada Batatavada Aloo vada recipe in marathi,बटाटावडा, वडापाव
बटाटावडा किंवा वडापाव या शब्दांची जादूच अशी आहे कि पंचपक्वान्नांनी पोट भरलेलं भूक लागते. हा पदार्थ गरीब श्रीमंत असा कोणताही भेदभाव न मानता सर्वांच्या प्लेटमध्ये आणि पोटामध्ये स्थिरावतो.One-dish-meal
बटाटवड्यासाठी लागणारे साहित्य:
बटाट्याची भाजीबेसन, तेल,
तिखट, मीठ, हिंग, हळद, ओवा, धनेजिरे पावडर, बारीक चिरलेली कोथिंबीर.
बटाटावडा कसा करावा - कृती:
आत सारण म्हणून बटाट्याची भाजी करून घ्यावी. ही भाजी खाली दिलेल्या २ प्रकारे करता येते.उकडलेल्या बटाट्याची भाजी प्रकार १, Potato Sabzi Type 1
उकडलेल्या बटाट्याची भाजी प्रकार २, Potato Sabzi Type 2
- बटाट्याची भाजी करून घ्यावी. कढईत तेल तापण्यास ठेवावे.
- तोपर्यंत एक भांड्यात बेसन घेऊन त्यात तिखट, मीठ, हिंग, हळद, ओवा, धनेजिरे पावडर, बारीक चिरलेली कोथिंबीर हे सर्व घालावे. थोडे थोडे पाणी घालत गुठळ्या होऊ न देता मिश्रण भिजवावे.
- अगदी सैलसर नको. दाट असले पाहिजे. गरम तेलाचे २ चमचे मोहन घालावे.
- बटाट्याच्या भाजीचे हव्या त्या आकाराचे गोळे बनवावेत. ते बेसन मिश्रणात पूर्ण भिजवून तेलात तळावेत.
- पिवळा रंग पूर्ण जाईपर्यंत तळावेत. कच्चे ठेऊ नये.
असे बटाटेवडे तयार होतील.
वडापाव करण्यासाठी लादी पाव विकत आणून त्याच्या मधोमध हा वडा ठेवावा.
Batata Vada with Coriander Chutney |
कोथिंबिरीच्या चटणीसोबत किंवा लसूण चटणीसोबत किंवा खजुराच्या चटणीसोबत एकदमच yummm.....
वडापावासोबत फोडणीच्या ओल्या मिरच्या द्याव्यात.
0 said:
Post a Comment
Your email id will always be confidential and safe.