Tags: Pulao, Veg biryani, Vegetable rice recipes, Kashmiri Pulav Rice recipe in marathi, भाताचे प्रकार mix vegetable pulav recipe in marathi

ह्या पुलावात भाज्या असल्याने दिसण्यास चांगला दिसतो आणि पौष्टिकही होतो.

व्हेज पुलाव साहित्य:

बासमती तांदूळ - १ कप 
तूप - १/२ चमचा 
२ तमालपत्र, ४ लवंग 
२ वेलची व २ दालचिनी 
भाज्या - फरसबी, गाजर, मटार, कांदा, फ्लॉवर 

पुलाव कसा करावा - कृती:

आवडतील त्या भाज्यांचे लहान तुकडे करावेत. फरसबी गाजराचे तिरकस तुकडे चांगले वाटतात. फ्लॉवरची छोटी छोटी फुलं काढावीत. कांदा उभा चिरावा. 
कांदा सोडवुन इतर भाज्या अर्धवट शिजवाव्यात. दीड मिनिटं मायक्रोवेव्ह केल्यास बरोबर शिजतात.
झाकण न ठेवता पाण्यात भाज्या उकळून घेतल्या तरी त्यांचा रंग टिकतो व पाहिजे तेवढ्याच शिजल्या जातात. काहीजणं सोडा घालतात पण विशेष गरज नाही.
पातेल्यात तूप घेऊन कांदा गुलाबी परतावा. त्यावर संबंध मसाला घालून तडतडू द्यावा. आवडत असल्यास २-३ काळी मिरी घातलीय तरी चालेल. 
यावर तांदूळ घालून हलक्या हाताने पण भरपूर परतावे. आधणाचे पाणी व मीठ घालून गरम झाल्यावर त्यात भाज्या घालून नीट सावकाश ढवळावे. भाताची शिते मोडता काम नयेत व भट फडफडीत व मोकळा झाला पाहिजे. 



Tags: Pulao, Veg biryani, Vegetable rice recipes, Kashmiri Pulav Rice recipe in marathi, भाताचे प्रकार mix vegetable pulav recipe in marathi

0 said:

Post a Comment

Your email id will always be confidential and safe.

About Me

My photo
Eat, Meditate, Smile & Repeat.

Visitors

Popular Posts

Blog Archive

Wish to read in English? Soon, I will share the link. Keep watching this space.