Tags: Common lemon pickle limbache lonache limbu lonche recipe in marathi, लिंबाचे साधे लोणचे, लिंबलोणच्याची रेसिपी
लिंबाच्या लोणच्याचे साहित्य:
५ डझन लिंबे६ चमचे मेथीदाणे - तळून पूड
२ वाट्या तिखट - तेलात परतून
१० ग्रॅम हिरा हिंग - तळून पूड
३ चमचे साधा हिंग - वरून घालायला
हळद - १ वाटी, साधारण १० चमचे - थलथलीत तेलात परतून
वरून पिळण्यासाठी १ डझन लिंबे
मीठ - ४ वाट्या + १/४ वाटी
अंदाज: ४ भाग लिंबाच्या फोडींना १ भाग मीठ
लिंबू लोणचे कसे घालावे - कृती:
- तिखट, मीठ, हिंग हळद, मेथीपूड चे एकत्रित मिश्रण करावे.
- लिंबाच्या फोडी कराव्यात व त्यांना वरील मिश्रण लावावे.
- स्वच्छ बरणीत खाली तळाला १/४वाटी मीठ नुसतेच घालावे व त्यावर लिंबाच्या फोडींचा एक थर द्यावा. या फोडींवर तिखट, मीठ, हिंग हळद, मेथीपूड मिश्रणाचा थर द्यावा. असे थर देत राहावे.
- वरून पिळण्यासाठी १ डझन लांबचा रस लागतो.
- पाण्याचा स्पर्श होऊन देऊ नये. दमट हवा लागू देऊ नये. ४-५ महिने नीट मुरवावे. एकेका महिन्याने काळजीपूर्वक ढवळावे. बरीच वर्ष टिकते.
खुप छान सुंदर
ReplyDeleteतोंडाला वाचुन पाणी सुटले
आवडले
धन्यवाद
Thank you so much. Also try out the recipe of lemon pickle for fast.
Delete