Tags: कोबीची भजी, Cabbage bhujiya, Cabbage pakoda,
कांदाभजी खावीशी वाटली तर कोबीची भजी उत्तम पर्याय आहे.
खाली लिहिलेली कृती नेहमीची, पाणी न वापरता केलेली आहे.Cabbage Pakore |
पत्ता कोबीची भजी साहित्य :
बारीक आणि उभी चिरलेली कोबीबेसन, तेल
तिखट, मीठ, हिंग, हळद, धणेजिरे पावडर,
ओवा, बारीक चिरलेली कोथिंबीर
कोबीच्या भजीची रेसिपी :
- कोबीची टोके कापून उभा पातळ चिरावा. चिरल्यावर हाताने मोकळा करावा.
- त्यात तिखट, मीठ, हिंग, हळद, धणेजिरे पावडर, ओवा, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून एकत्र करावे.
- दहा मिनिटे तसेच ठेवल्यानंतर त्याला पाणी सुटते, या सुटलेल्या पाण्यात बसेल इतकेच बेसन त्यात हळू हळू घालत हाताने कालवीत राहावे.
- यावर कडकडीत तेलाचे २ चमचे मोहन घालावे.
- हातानी थोडे थोडे मिश्रण उचलून कोणताही आकार न देता तेलात तळावे. कोबी उभी चिरलेली असल्यानी भज्यांना टोके येतात.
ही भजी कधी कधी कढीत घालून कढी-पकोडे बनवता येतात.
सोबत फोडणीची ओली मिरची द्यावी.