लोणचं, चटणी, कोशिंबीर हा जेवणाचा अविभाज्य भाग आहे.
अतिशय विचारपूर्वक बनवल्या गेलेल्या भारतीय जेवणपद्धतीत लोणची चटण्या कोशिंबिरी ताटाच्या डाव्या बाजूला वाढल्या जातात; कारण त्या भाजीपेक्षा कमी प्रमाणात खाल्ल्या जातात आणि जाव्यात.
कारण साहजिक आहे लोणची टिकवण्यासाठी त्यात मिठाचे प्रमाण जास्त असते इ. इ.
आपलं जेवण नुसतं हातातोंडानी होत नाही तर पाच ज्ञानेंद्रियेही कार्यरत असतात. ताटातली ही डावी बाजू कमी प्रमाणात असूनही वास, रंग आणि चवीने appetizer चं काम उत्तम करते. भूक वाढल्याने मनही संपूर्णपणे अन्नावर असतं.

कोणतीही गोष्ट खूप काळापर्यंत टिकवायची असेल तर पाण्यापासून दूर ठेवायला लागते. पाण्याशी किंवा दमट हवेशी संबंध आला की लगेच बुरशी येऊ शकते व चव बदलते.
यासाठी टिकवण्याचे पदार्थ शक्यतो  असलेल्या काचेच्या बरण्यांमध्ये भरावेत. म्हणजे बरणी न उघडताच बाहेरून अंदाज येईल.
पावसाळी वातावरणात हवेत आर्द्रता असल्याने असे पदार्थ सहसा पावसाळ्यात केले जात नाहीत.
याउलट उन्हाळ्यातली कोरडी हवा व कडक ऊन ओलसरपणाची शक्यता कमी करते.

कोणत्याही फळाच्या फोडी  साखरेच्या किंवा गुळाच्या पाकात नीट मुरवल्या की तो त्या फळाचा मुरंबा / मुरांबा / मोरंबा / मोरांबा होतो.
काही फळे आधी शिजवून पाकात घातली जातात तर काही पाकातच शिजवली जातात.
फोडी पाकातच जास्त वेळ शिजवल्याने त्या चिवट होऊ शकतात; त्यामुळे त्या वेगळ्या शिजवून घेऊन मग पाकात घालून पुन्हा शिजवाव्यात.
काही फळांच्या फोडींना पाकात घातल्यावर पाणी सुटते. अशावेळी पाणी आते पर्यंत जर त्या पाकातच ठेवल्या तरी कडक होतात; म्हणून अशावेळी त्या फोडी बाजू ला काढून घेऊन पाक पक्का करावा आणि नंतर फोडी घालून थोडे शिजवावे.




0 said:

Post a Comment

Your email id will always be confidential and safe.

About Me

My photo
Eat, Meditate, Smile & Repeat.

Visitors

Popular Posts

Wish to read in English? Soon, I will share the link. Keep watching this space.