Thepla Thepale Methi Paratha recipe in marathi

प्रवासात जाताना हमखास घेतला जाणारा पदार्थ म्हणजे ठेपले. ठेपला हा गुजराथी शब्द आहे. म्हणजेच मेथीचे पराठे किंवा मेथीची थालिपीठं. काही ठिकाणी याला मेथीचे धपाटे असंही म्हणतात. 

मेथीच्या पराठ्याचे साहित्य :

यांपैकी मेथी व गव्हाचे पीठ  बेसिक आहेत. बाकी असल्यास उत्तमच!
निवडलेली मेथी,
थोडी कोथिंबीर,
कांद्याची  पात 
गव्हाचं पीठ 
ज्वारीचं पीठ, बेसन 
ओवा, लसूण ,धणेजिरे पावडर, बडीशेप, तिखट, मीठ, हिंग, हळद, दही 

मेथी ठेपला कृती:

निवडलेली मेथी धुवून बारीक चिरावी. कोथिंबीर व कांद्याची पात धुवून बारीक चिरावी. करावे. 
काहीजण मेथी आधी तेलात परतवून घेतात भाजीसारखी, व नंतर पिठात मळतात. पण भाजी न करता कच्ची चिरून घातलेली जास्त सोपी पडते व चांगली लागते. 
सर्व प्रकारची पिठं एकत्र करावीत. गव्हाचं पीठ जास्त घ्यावे. त्यात थोडा ज्वारीपीठ, थोडं बेसन, असल्यास नाचणीचं पीठ घालावे. जेवढे भाग चिरलेली भाजी असेल तेवढेच भाग पीठ घालावे. जास्त नको. 
ओवा, धणेजिरे पावडर, बडीशेप, तिखट, मीठ, हिंग, हळद हे पिठात घालून एकत्र करावे. 
लसणीचा ठेचा घालावा. दाताखाली लसूण आलेली आवडत नसेल तर लसूण ठेचा पाण्यात कालवून ते पाणी घालावे. लसूण खात नसल्यास घालू नये. 
पिठात चिरलेली भाजी वगरे घालून घट्ट कणिक भिजवावी व नेहमीप्रमाणे पोळ्या लाटाव्या. 
तव्यावर भाजताना हलकेच कपड्याने दाबल्यास मऊ होतात व फुलतात. 
Thepla with Beetroot Chutney,
Tomato Sabzi & Chilli Pakoda
हे ठेपले टोमॅटोच्या साध्या भाजीशी खाता येतात. लोणचं, सॉस किंवा नुसतं तूप किंवा बटर घेऊनही खाऊ शकतो. कोणत्याही कोशिंबीरीसोबत खाता येतं. ह्या फोटोत मी बीटाची कोशिंबीर आणि मिरचीचे भजे दाखवले आहे.





0 said:

Post a Comment

Your email id will always be confidential and safe.

About Me

My photo
Eat, Meditate, Smile & Repeat.

Visitors

Popular Posts

Blog Archive

Wish to read in English? Soon, I will share the link. Keep watching this space.