Tags: Instant sada dosa rice flour dosa without baking soda recipe in marathi, tandulacha dosa
३० मिनिटे - २० डोसेपेपर डोसा साहित्य:
३ वाट्या तांदुळाची पिठी१ वाटी उडीद डाळ
मीठ पाणी
इन्स्टंट डोशाची रेसिपी :
तांदुळाची पिठी पाण्यात भिजवून ठेवावी. थलथलीत भिजवावी. जास्त पाणी नको.उडीद डाळ थोड्या कोमट पाण्यात भिजवावी. साधारण अर्ध्या तासाने ती फुगेल व डाळ हाताने मोडता येईल.
उडीद डाळ अशी भिजली कि मिक्सर मधून बारीक करावी. पाणी एकदम घालू नये.
थोडे थोडे पाणी घालत, थोडे थोडे थांबवत मिक्सर फिरवावा. म्हणजे डाळ हलकी होते.
डाळ मोडून पूर्ण मऊसूत पेस्ट झाली पाहिजे. बाजूला काढून मिक्सर मध्ये तांदुळाची पिठी फिरवावी.
मग डाळीची पेस्ट त्यात घालून एकत्र नीट ब्लेंड करावे. म्हणजे एकजीव होईल.
जास्त पाणी घालू नये. पीठ घट्टच असावे.
एक एक डाव पीठ काढून त्यात अंदाजे पाणी व मीठ घालावे.
नॉनस्टिक तव्यावर पाणी मारून डोशाचं पीठ गोल गोल पसरवावे.
त्याला बारीक जाळीची भोके पडतात. पटकन शिजतो. बाजूनी सुटू लागला कि उलटवावा.
झाकण ठेऊ नये.
चटणी सोबत खावे.
0 said:
Post a Comment
Your email id will always be confidential and safe.