Tags: Ragada, Ragda, White peas ragda sabji, Pandhare vatane ragda pandharya vatanyachi usal safed vatana sabji

रगडा पॅटीस किंवा पाणीपुरीसाठी बनवला जातो हा पांढऱ्या वाटण्याचा रगडा. भाजीसारखाही खाऊ शकतो. जास्त उरला तर मिसळीसारखा बनवू शकतो.

रगडा पॅटीसच्या रगड्यासाठी लागणारे साहित्य:

पांढरे वाटणे - २५० ग्रॅम 
लसूण पाकळ्या - ६-७
आलं - १/४ इंच 
हळद, कोथिंबीर, फोडणीची सामग्री 
कांदे - २ मध्यम 
हिरव्या मिरच्या किंवा लाल तिखट 
मिरपूड, जिरे, गरम मसाला 

रगडा कृती:

  • पांढरे वाटणे रात्रभर भिजत टाकावेत. साधारण ६-७ तास भिजवावे लागतात. 
  • फुगून आकाराने दुप्पट झाले कि प्रेशर कुकरमध्ये २ लसूण पाकळ्या, जिरे व चिमूटभर हळद घालून शिजवावेत. पूर्ण शिजवावेत पण अगदी मेण करून नये. २ शिट्ट्या पुरे होतात. 
  • कढईत तेल घेऊन त्यात आलं लसूण पेस्ट घालावी. परतावे. 
  • बारीक चिरलेला कांदा घालावा व गुलाबी करावा. गरम मसाला घालावा. 
  • हिंग, जिरे, हळद, लाल तिखट किंवा हिरव्या मिरच्या फोडणीत घालून चांगले परतावे. 
  • यावर शिजवलेले वाटणे टाकून भरपूर ढवळावे. मीठ घालावे. 
यात पाणी बरेच सामावते. पण हळू हळू घालावे. पळीने ठेचून ठेचून जमतील तितके दाणे मॅश करावे. 
पाणी भराभर आटत जाते. 
वरुन कोथिंबीर घालावी. लसूण जास्त घातली तर जास्त छान चव येते. 
white peas sabzi pandhare vatane ragada pandharya vatanyachi bhaji usal
Ragada
हा रगडा पाणीपुरीसोबत लागतो. रगडा पॅटीस सोबत लागतो. सध्या भाजीसारखा पोळीबरोबर खाता येतो. 















Tags: Ragada, Ragda, White peas ragda sabji, Pandhare vatane ragda pandharya vatanyachi usal safed vatana sabji


0 said:

Post a Comment

Your email id will always be confidential and safe.

About Me

My photo
Eat, Meditate, Smile & Repeat.

Visitors

Popular Posts

Blog Archive

Wish to read in English? Soon, I will share the link. Keep watching this space.