Kanda bhaji Kandabhaji, Onion bhaji, Pyaaj ke pakode pakora recipe in marathi

कांद्याची भजी, चहा आणि पावसाळा !! Do you really need any more explanation?? 😊 ही भजी दोन पद्धतींनी केली जातात - उभी चिरून गोल काप करून.
खाली लिहिलेली कृती नेहमीची, पाणी न वापरता केलेली आहे.
या शिवाय दुसरी पद्धत कांदा आणि इतर भाज्यांसाठी जवळपास सारखीच आहे.

साहित्य:

४ मध्यम कांदे
बेसन, तेल
तिखट, मीठ, हिंग, हळद, धणेजिरे पावडर,
ओवा, बारीक चिरलेली कोथिंबीर

कृती:

  • कांद्याची टोके कापून उभा पातळ चिरावा. सगळे कांदे चिरल्यावर हाताने मोकळा करावा.
  • त्यात तिखट, मीठ, हिंग, हळद, धणेजिरे पावडर, ओवा, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून एकत्र करावे.
  • दहा मिनिटे तसेच ठेवल्यानंतर त्याला कांद्याला पाणी सुटते, या सुटलेल्या पाण्यात बसेल इतकेच बेसन त्यात हळू हळू घालत हाताने कालवीत राहावे.
  • यावर कडकडीत तेलाचे २ चमचे  परत कालवून घ्यावे.
  • हातानी थोडे थोडे मिश्रण उचलून कोणताही आकार न देता तेलात तळावे. कांदा उभा चिरलेला असल्यानी भज्यांना टोके येतात.
Kandabhaji Onion Pakode
ही भजी कधी कधी कढीत घालून कढी-पकोडे बनवता येतात.
कांदाभज्यांसोबत फोडणीची ओली मिरची द्यावी.


0 said:

Post a Comment

Your email id will always be confidential and safe.

About Me

My photo
Eat, Meditate, Smile & Repeat.

Visitors

Popular Posts

Blog Archive

Wish to read in English? Soon, I will share the link. Keep watching this space.