Tags: lady finger sabji with gravy, okra recipes, bhindi, bhendichi bhaji, bhindi ki subzi, bhindi with gravy, chinchgulachi bhendi, rasdar bhendi, chinchgulachi bhendi, okra with gravy recipe in marathi, भेंडी भाजी, सब्जी
१५ मिनिटे - ४ जणांसाठी
Read in English here - Lady finger sabzi recipe
रसदार भेंडीच्या भाजीचे साहित्य :
पाव किलो भेंडी१ मध्यम कांदा
बोराएवढी चिंच, तेवढाच गूळ,
थोडा पुदिना, मीठ
मसाला म्हणून ८ लसूण व ५ लाल मिरच्या मिक्सरवर वाटून घ्याव्या.
चिंचगुळाच्या भेंडीची कृती :
- भेंडी मोठी मोठी चिरावीत. कांदा बारीक चिरावा. चिंच कोळून घ्यावी.
- कढईत तेल गरम करून त्यावर कांदा, वाटलेला मसाला घालून परतावे. थोडा चिंचेचा कोळ घालावा.
- जरासं परतून भेंडी घालावी. लगेचच मीठ घालावे. थोडावेळ शिजू द्यावे.
- चिंचेचा उरलेला कोळ आणि गूळ घालून पूर्ण शिजवावे. चिरलेला पुदिना घालून एकत्र करावं.
इंग्लिशमध्ये वाचण्यासाठी - Read in English here - Lady finger sabzi recipe
0 said:
Post a Comment
Your email id will always be confidential and safe.