Tags: Mint Coriander Chatani Chutney Pudina Kothimbir Chatani recipe in marathi, पुदिना कोथिंबिरीची चटणी, green chutney, hirvi chatni, हिरवी चटणी
मिंट चटणी साहित्य:
कोथिंबीर - १ वाटी, निवडून धुवूनपुदिना - १/२ वाटी
ओलं खोबरं - १/२ वाटी
लसूण पाकळ्या - ५-६
आलं- १ इंच
मिरच्या ४-५
आंबट कैरीचा कीस - २ चमचे
जिरे, हिंग, साखर, मीठ
पुदिन्याच्या चटणीची रेसिपी - कृती:
आलं, मिरच्यांचे तुकडे, लसूण पाकळ्या, जिरं, जराशी साखर मिक्सरमधे वाटावे.त्यात कोथिंबीर आणि पुदिना घालून फिरवावी. नंतर ओलं खोबरं व आंबट कैरीचा कीस घालावा. मीठ, हिंग घालावे.
शक्यतो सुरुवातीला कोरडेच फिरवावे आणि मग हळू हळू आवश्यकतेप्रमाणे पाणी घालत वाटावे.
उन्हाळ्यात अगदी अवश्य करावी. बटाटेवड्यांबरोबर मस्त लागते. थंडावा मिळतो.
इतर दिवसांत कैरी नसेल तेव्हा लिंबू पिळावे.
कधी कधी हि चटणी घट्ट कोरडीच छान वाटते.
पूर्ण मऊ पेस्ट केली कि पाणी भरपूर सामावते व पुरवठ्यास येते.
ही चटणी कोणत्याही तळलेल्या पदार्थांसोबत किंवा डोसे, घावन, इडली यांसोबत खाता येते.
Coconut Coriander Chutney |
याशिवाय वेगळ्या पद्धतीने ही चटणी बनवता येते-
कोथिंबिरीची चटणी प्रकार १
कोथिंबिरीची चटणी प्रकार २
Real clean website, regards for this post.
ReplyDeleteThanks for liking the pudina chatani recipe.
Delete