Panipuri Mitha chatni, Khajur chatani, panipurichi god chutney recipe in marathi Meetha chatani Khajurachi Chatani chinchagulachi chatni
साहित्य:
१०-१२ ओले खजूरपाव वाटी गूळ
पाववाटी पेक्षा किंचित जास्त चिंच
कृती:
- खजुराच्या बिया व टोके काढावीत. चिंचोके वेगळे करावेत.
- माइक्रोवेव्ह असला तर अगदी २ मिनिटात चटणी होते. मायक्रोवेव्ह नसेल तर गरम पाण्यात गूळ चिंच व खजूर भिजत टाकावे. तासभर भिजल्यावर गरम होतील,
- हे हाताने थोडे कोळून घ्यावे. मिक्सरमधून पूर्ण एकजीव करावे. थोडे थोडे पाणी अंदाजाने घालावे.
- मायक्रोवेव्ह असेल तर भिजत वगरे ठेवण्याची मुळीच गरज नाही. बिया काढलेली चिंच खजूर आणि गूळ मायक्रोसेफ बाउलमध्ये ३ मिनिटे हायवर शिजवावे. व जरा गार करून तसेच मिक्सरमध्ये फिरवावे.
- मऊसूत पेस्ट होते; अंदाजे पाणी घालावे.
ही गोड चटणी आणि तिखट चटणी तयार झाली की पाणीपुरी झालीच. पांढऱ्या वाटण्याचा रगडा करावा.
भेळ, शेवपुरी, पाणीपुरी, रगडा पॅटीस, मक्याचे पॅटीस किंवा कोणत्याही चाट प्रकारासोबत खाता येईल.
Khajur chatney |
Panipuri |
गोड चटणी 3 ते 4 महिने टिकावी त्यासाठी काय करावे लागेल कृपया मार्गदर्शन करावे
ReplyDeleteपाणीपुरीची गोड चटणी टिकवायची असेल तर पाणी वापरून चालणार नाही. खजूर बिया काढून साफ करावे. चिंच स्वच्छ करावी. गूळ किसून घ्यावा. खजूर, चिंच आणि गूळ एकत्र करून हाताने कुस्करावे. ओव्हन असेल तर काम सोपे होते. ओव्हनमध्ये एका बाउल मध्ये हे मिश्रण गरम करावे. गूळ पूर्ण पातळ होतो. जरा उकळल्या सारखा होतो. ओव्हन बंद करून मिश्रण साधारण थंड होऊ द्यावे. नंतर मिक्सरमधून थोडे थोडे करत मऊ पेस्ट करावी. ही पेस्ट टिकते. पण फ्रिजमध्ये ठेवावी.
Deleteओव्हन नसेल तर गुळाचा पाक करून त्यात खजूर चिंच घालता येते.
मुख्य गोष्ट ही कि पाणी जराही नको. मिश्रण गरम असताना मिक्सर मधून फिरवले तर वाफेचे पाणी होते. आणि पूर्ण थंडगार करून फिरवले तर मऊसूत पेस्ट होत नाही. त्यामुळे बेताचे थंड झाले कि थांबवत फिरवावे. मधेच झाकण उघडून वाफ निघू द्यावी.
वापरतेवेळी त्यात जरूरीपुरते पाणी, मीठ, तिखट, भाजलेल्या जिऱ्याची पूड घालावी.