Tags: homemade biscuits, Coconut biscuits khobrachi biscuits recipe in marathi
१५ मिनिटेखोबऱ्याचे बिस्कीट साहित्य:
सुक्या खोबऱ्याचा कीस - १ वाटीबेकिंग पावडर - अर्धा चमचा
गव्हाचे पीठ - अर्धी वाटी
पीठीसाखर - अर्धी वाटी
पातळ तूप - अर्धी वाटी
चारोळ्या - २ लहान चमचे
खसखस - १ चमचा
वेलची पूड
घरी बिस्किटे कशी करावीत - कृती:
गहूपीठ व पीठीसाखर एकत्र चाळावी.यात किसलेले खोबरं, चारोळी, खसखस, वेलची पूड मिक्स करा.
त्यातच डालडा तूप पातळ करून हाताने सर्व कालवावे.
त्यात अर्धा चमचा बेकिंग पावडर घालून एकजीव करून त्याचे लिंबाएवढे चपटे गोळे बनवावेत.
हवा तो बिस्किटाचा आकार द्यावा. जास्तीत जास्त अर्धा इंच जाड.
अल्युमिनियमच्या ताटाला तूप लावून हि बिस्किटे ताटात ठेवावीत.
गॅसवर तवा ठेऊन गरम करा. तापल्यावर गॅस मंद करून हे ताट त्या तव्यावर ठेवावे.
या ताटावर झाकण ठेवावे. ७-८ मिनिटांनी ताट खाली उतरवून गार झाल्यावर कालथ्याने बिस्किटे काढावीत.
0 said:
Post a Comment
Your email id will always be confidential and safe.