Tags: simple kofta curry, quick kofta, zatpat kofta, instant kofta quick simple kofta curry recipe in marathi
२५ मिनिटे - ५ जणांसाठी
To read in English : Instant Kofta Curry
कोफ्ता करी साहित्य :
कोफ्त्यासाठी - २ मोठे कांदे, २ मोठे बटाटे, तिखट मीठ हिंग हळद धनेजिरे पावडरकरीसाठी - १ मोठा कांदा, २ मध्यम टोमॅटो, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला,
कोफ्ता करीची कृती :
- कोफ्ते:
कांदा किसून पाणी काढावे, बटाटा मऊ शिजवून मॅश करावा. एकत्र करावे.
यात तिखट मीठ हिंग हळद धनेजिरे पावडर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून लहान गोळे तळावेत. - करी:
कांदा किसावा किंवा प्युरी करावी. टोमॅटोची पुरी करावी.
कढईत गरम तेलात कांद्याची प्युरी व आलंलसूण पेस्ट घालावी. हिंग हळद गरम मसाला धणेपूड घालावी. तिखट घालावे. जरा परतल्यावर टोमॅटोची प्युरी घालावी. अंदाजे पाणी घालून शिजवावे.
वाढण्याआधी थोडावेळ कोफ्ते घालून एकदोन उकळ्या आणाव्यात. कोथिंबीर घालावी.
तिखट रंगाचे असेल तर रंग छान येतो. तिखटाचा तवंग हवा असेल तर तिखट घातल्या घातल्या चिमूटभर साखर घालावी.
To read in English : Instant Kofta Curry
0 said:
Post a Comment
Your email id will always be confidential and safe.