Shahi stuffed simla mirchi recipe in marathi
शक्यतो लहान आकाराच्या मिरच्या वापराव्यात. भरली सिमला मिरचीचा पहिला प्रकार कमी तिखटाचा आहे. हा दुसरा प्रकार काजू पनीरयुक्त असल्याने यास शाही स्टफ्ड सिमला मिरची म्हटले जाते. बाकीचे प्रकार एकत्रितपणे भरली सिमला मिर्च प्रकार ३ यात दिले आहेत.साहित्य:
सिमला मिरची - सारख्या आकाराची व लहान
लोणी
सारणासाठी -
पनीरचा चुरा - ४ टेबलस्पून
उकडलेले मटार - ३ चमचे
ओलं खोबरं - २ चमचे
काजू, बेदाणे,
गरम मसाला
मीठ, मिरपूड, कोथिंबीर
टोमॅटो सॉस
कृती:
- ढब्बू मिरच्यांच्या देठाच्या बाजूने पातळ चकती कापून चमचा किंवा सुरीने आतील बिया काढून टाकाव्या.
- पनीर चुरा, उकडलेले मटार, ओलं खोबरं, काजू, बेदाणे, गरम मसाला, मीठ, मिरपूड नीट एकत्र करावी.
- त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर व टोमॅटो सॉस घालून सारण ओलसर करावे.
- हे ओलं सारण मिरच्यांमध्ये भरावे.
- भरलेल्या मिरच्यांना बाहेरून लोणी लावावे. ह्या मिरच्या नॉनस्टिक पॅनमध्ये भाजाव्या. ओव्हनमध्ये बेक केल्यास रंग व आकार बदलत नाही.
0 said:
Post a Comment
Your email id will always be confidential and safe.