Tags: Solkadhi recipe in marathi, solkadi, solkadhi, kokum kadhi, amsul kadhi, kokum coconut milk kadi
१० मिनिटे - ६ जणांसाठी
To read in English click - Solkadhi recipe in english
सोलकढी उपवासासाठीसुद्धा बनवता येते. उपवासाच्या सोलकढीची रेसिपी इथे लिहीली आहे.
सोलकढी उपवासासाठीसुद्धा बनवता येते. उपवासाच्या सोलकढीची रेसिपी इथे लिहीली आहे.
सोलकढीचे साहित्य:
१०-१२ आमसुले किंवा १ टेबलस्पून कोकम आगळएक नुकताच खोवलेला नारळ
२-३ हिरव्या मिरच्या, ३-४ लसूण पाकळ्या
मीठ साखर कढीपत्ता कोथिंबीर
सोलकढी कशी करावी :
- आमसुले पाण्यात एक दीड तास भिजत ठेवावीत व न कुस्करता काढून टाकावीत.
- नारळ खोवून त्याचे जाड व पातळ दूध काढावे. (click here for 'How')
- हिरव्या मिरच्यांचे, लसणीचे बारीक बारीक तुकडे करावेत. कढीपत्ता कोथिंबीर बारीक चिरावी. किंवा मिरची लसूण कढीपत्ता कोथिंबीर यांची एकत्रित पेस्ट करूनही वापरता येते.
- नारळाचे काढलेले दूध व आमसुलाचे पाणी एकत्र करून त्यात वरील बारीक चिरलेला अथवा पेस्ट केलेला मसाला घालावा.
कोकम आगळ वापरलेलं असल्यास नारळाच्या दुधात आवश्यकतेप्रमाणे पाणी घालून त्यात आगळ घालावे. (सोलकढी खूप पातळ झाली तर पाणचट लागते, नारळाच्या दुधाची चव राहिली पाहिजे इतपत पाणी घालावे )
मीठ साखर घालावी.
सोलकढीला फोडणी नाही दिली तरीही छानच लागते. लसूण चालत नसल्यास नाही घातला तरी हरकत नाही.
जिऱ्याची पूड घालायची असेल तर मात्र अगदी वाढतानाच घालावी. आधीपासून घातली तर रंग बदलतो.
To read in English click - Solkadhi recipe in english
Nice information it's helpful for me...Thanks
ReplyDelete