Tags: Green chilli Mirchi Bhaji Recipe in Marathi, mirchyanchi bhaji, talnichya mirchya talanichi mirchi, मिरच्यांची भजी, तळणीच्या मिरचीची भजी
बरंच गोड गोड खाऊन झालं, सारखी कांद्याची बटाट्याची भजी खाल्ली की थोडा चवीत बदल म्हणून मिरच्यांची भजी खावीत. सहज बनतात आणि मुख्य म्हणजे बेसन किंवा मिरच्या उरलेल्या असतील तर करता येतात.साहित्य व कृती:
१. मिरच्यांच्या मधोमध उभी चीर द्यावी. देठ तोडू नये व मिरचीचे दोन तुकडेही होता कामा नयेत.
बेसन, तिखट, मीठ, हिंग, हळद, ओवा एकत्र करून पाण्यात भिजवावे. त्यात मिरच्या घोळवून तळाव्यात.
२. भरली भाजी करताना आपण सारण करतो ते कधी उरलेलं असतं. हे सारण कसं बनवावं ते त्या त्या भाजीच्या रेसिपी पोस्ट मध्ये लिहिले आहे.
असं उरलेलं सारण मिरचीच्या पोटात भरावे आणि मग ती मिरची बेसनाच्या वर दिलेल्या मिश्रणात घोळवून तेलात तळावी. मस्त लागते.
कोणत्याही प्रकारे करताना मिरचीच्या बिया काढू नयेत.
0 said:
Post a Comment
Your email id will always be confidential and safe.