Tags: Instant Rava dosa without baking soda recipe in marathi semolina dosa, रवा डोसा
३० मिनिटे - २० डोसेरव्याच्या इन्स्टंट डोशाचे साहित्य:
३ वाट्या बारीक रवा१ वाटी उडीद डाळ
मीठ पाणी
रवा डोशाची कृती:
- बारीक रवा पाण्यात भिजवून ठेवावा. थलथलीत भिजवा. जास्त पाणी नको.
- उडीद डाळ थोड्या कोमट पाण्यात भिजवावी. साधारण अर्ध्या तासाने ती फुगेल व डाळ हाताने मोडता येईल.उडीद डाळ अशी भिजली कि मिक्सर मधून बारीक करावी. पाणी एकदम घालू नये.
- थोडे थोडे पाणी घालत, थोडे थोडे थांबवत मिक्सर फिरवावा. म्हणजे डाळ हलकी होते.
- डाळ मोडून पूर्ण मऊसूत पेस्ट झाली पाहिजे. बाजूला काढून मिक्सर मध्ये बारीक रवा फिरवावा.
- मग डाळीची पेस्ट त्यात घालून एकत्र नीट ब्लेंड करावे. म्हणजे एकजीव होईल.
- जास्त पाणी घालू नये. पीठ घट्टच असावे. एक एक डाव पीठ काढून त्यात अंदाजे पाणी व मीठ घालावे.
- नॉनस्टिक तव्यावर पाणी मारून डोशाचं पीठ गोल गोल पसरवावे.
- त्याला बारीक जाळीची भोके पडतात. पटकन शिजतो. बाजूनी सुटू लागला कि उलटवावा. झाकण ठेऊ नये.
चटणी सोबत खावे.
0 said:
Post a Comment
Your email id will always be confidential and safe.