Tags: hiravi chutney, Green chatni coriander chatani kothimbir chutney recipe in marathi, हिरवी चटणी
कोथिंबिरीच्या चटणीचे साहित्य:
कोथिंबीर - १ वाटी, निवडून धुवूनओलं खोबरं - १/२ वाटी
लसूण पाकळ्या - ५-६
आलं- १ इंच
मिरच्या ४-५
आंबट कैरीचा कीस - २ चमचे
जिरे, हिंग, साखर, मीठ
कोथिंबीर चटणी रेसिपी :
आलं, मिरच्यांचे तुकडे, लसूण पाकळ्या, जिरं, जराशी साखर मिक्सरमधे वाटावे.त्यात कोथिंबीर घालून फिरवावी. नंतर ओलं खोबरं व आंबट कैरीचा कीस घालावा. मीठ, हिंग घालावे.
शक्यतो सुरुवातीला कोरडेच फिरवावे आणि मग हळू हळू आवश्यकतेप्रमाणे पाणी घालत वाटावे.
उन्हाळ्यात अगदी अवश्य करावी. बटाटेवड्यांबरोबर मस्त लागते.
कधी कधी हि चटणी घट्ट कोरडीच छान वाटते. ओलसरपणासाठी लिंबाचा रस पुरेसा होतो.
पूर्ण मऊ पेस्ट केली कि पाणी भरपूर सामावते व पुरवठ्यास येते.
ही चटणी कोणत्याही तळलेल्या पदार्थांसोबत किंवा डोसे, घावन, इडली यांसोबत खाता येते.
Coriander chatani |
याशिवाय वेगळ्या पद्धतीने ही चटणी बनवता येते-
कोथिंबिरीची चटणी प्रकार १
पुदिना कोथिंबिरीची चटणी
0 said:
Post a Comment
Your email id will always be confidential and safe.