Tags: Kelfulachi bhaji, kelphul bhaaji, kele ke ful ki sabji, banana flower sabji, केळीच्या फुलाची भाजी 

३० मिनिटे - ५-६ जणांसाठी 
इंग्लिशमध्ये रेसिपी वाचण्यासाठी - Banana Flower Vegetable Recipe

केळफुलाची भाजी साहित्य:

१ मध्यम केळफूल 
२ कांदे 
थोडेसे पांढरे वाटाणे 

१/२ चमचा सारस्वत मसाला 
१ वाटी ताक १ वाटी पाणी
३-४ हिरव्या मिरच्या, थोडा गूळ (optional), मीठ, फोडणी, खोबरं, कोथिंबीर

केळफूलाच्या भाजीची कृती:

  • केळफूल नीट करून बारीक चिरावे आणि ताक + पाण्यात घालावे. 
  • भाजी  सकाळी करायची असल्यास केळफूल चिरून ताक व पाण्यात रात्रीच घालून ठेवावे.
  • थोडे वाटणे रात्रीच पाण्यात भिजत घालावेत.
  • केळफूल चोळून दोंन तीन वेळा पाण्यातून धुवून काढावे म्हणजे राप जातो. 
  • केळफूल व वाटणे वेगवेगळे शिजवून घ्यावेत (कुकरमध्ये)
  • कांदा बारीक चिरावा, मिरच्या उभ्या चिराव्यात. 
  • कढईत तेल गरम करून कांदा मिरची हिंग हळद घालावे. 
  • शिजलेले केळफूल व वाटाणे घालावेत. मसाला घालावा. 
  • मीठ कोथिंबीर खोबरं गूळ (optional) टाकून थोडा वेळ शिजवावे. 
To read in English, click - Banana Flower Vegetable Recipe


Tags: Kelfulachi bhaji, kelphul bhaaji, kele ke ful ki sabji, banana flower sabji, केळीच्या फुलाची भाजी 

0 said:

Post a Comment

Your email id will always be confidential and safe.

About Me

My photo
Eat, Meditate, Smile & Repeat.

Visitors

Popular Posts

Blog Archive

Wish to read in English? Soon, I will share the link. Keep watching this space.