Tags: Green chatni coriander chatani kothimbir chutney recipe in marathi, hirvi chatni, हिरवी चटणी 

कोथिंबिरीच्या चटणीचे साहित्य: 

कोथिंबीर - १ वाटी, निवडून धुवून

ओलं खोबरं - १/२ वाटी 

आलं- १ इंच

मिरच्या ४-५
जिरे, हिंग, साखर, मीठ, लिंबू 

कोथिंबीर चटणीची रेसिपी :

आलं, मिरच्यांचे तुकडे, जिरं, चमचाभर साखर मिक्सरमधे वाटावे. 
त्यात कोथिंबीर घालून फिरवावी. नंतर ओलं खोबरं घालावे. मीठ, हिंग घालावे.
उपवासासाठी करायची झाल्यास हिंग घालू नये.
शक्यतो सुरुवातीला कोरडेच फिरवावे आणि मग हळू हळू आवश्यकतेप्रमाणे पाणी घालत वाटावे. 
चटणी पूर्ण तयार झाली कि वरून लिंबू पिळावे.
कधी कधी हि चटणी घट्ट कोरडीच छान वाटते. ओलसरपणासाठी लिंबाचा रस पुरेसा होतो. 
पूर्ण मऊ पेस्ट केली कि पाणी भरपूर सामावते व पुरवठ्यास येते. 
ही चटणी कोणत्याही तळलेल्या पदार्थांसोबत किंवा डोसेघावनइडली यांसोबत खाता येते.
green chatani coriander chatani for sandwiches dosa idli parathas and pakora
Coconut Coriander Chutney

याशिवाय वेगळ्या पद्धतीने ही चटणी बनवता येते-
कोथिंबिरीची चटणी प्रकार २
पुदिना कोथिंबिरीची चटणी









https://chavishtafood.blogspot.com/search/label/chatni-chatani-chutney

0 said:

Post a Comment

Your email id will always be confidential and safe.

About Me

My photo
Eat, Meditate, Smile & Repeat.

Visitors

Popular Posts

Blog Archive

Wish to read in English? Soon, I will share the link. Keep watching this space.