Tags Stuffed brinjals sabzi Bharli vangi eggplant bharva baingan vangyachi bhaji recipe in marathi
भरली वांगी मी दोन पद्धतीने देत आहे. हा पहिला प्रकार सौम्य चवीचा आहे व भरली वांगी प्रकार २ चमचमीत आहे.वांगी ताजी, लहान आकाराची व बिया कमी असलेली निवडावीत. चिरण्याच्या २ पद्धती आहेत. एक पद्धत या रेसिपीमध्ये आणि दुसरी प्रकार २ च्या रेसिपी मध्ये दिलेली आहे. सोयीप्रमाणे कोणतीही वापरू शकता. काहीजणं वांग्यांची देठं काढत नाहीत तर काही काढतात. खाली दिलेल्या चिरण्याच्या पद्धतीत देठे काढावी लागतात.
भरल्या वांग्याच्या भाजीचे साहित्य:
लहान आकाराची वांगी - माणशी ३ओलं खोबरं
दाण्याचं कूट, तिळाचं कूट
गोडा मसाला
चिंच गूळ
तिखट मीठ कोथिंबीर तेल
आवडत असल्यास कांदा व लसूण.
भरली वांग्याच्या भाजीची कृती:
- वर सांगितल्याप्रमाणे वांगी चिरण्याचे २ प्रकार आहेत. या प्रकारात वांग्यांची देठे काढावी लागतात.
- प्रकार २ मध्ये देठं काढण्याची गरज नाही. आवडी प्रमाणे कापावीत व सारण भरावे.
- वांग्याची देठे कापावीत. व त्याच बाजूने (देठाकडच्या) जरा वरपर्यंत उभी चीर द्यावी. पण दोन तुकडे होऊ देऊ नयेत. मग ते वांगे Upside down फिरवून देठाच्या समोरील भागापासून देठापर्यंत, आधीच्या चिरलेला Perpendicular अशी दुसरी चीर द्यावी. या non intersecting चिरांमुळे वांगे 2 planes मध्ये divide होईल. खाली फोटो दिलेला आहे.
- एका पातेल्यात वांगी बुडतील इतके साधे पाणी घेऊन ही चिरलेली वांगी त्यात ठेवावीत. यामुळे वांग्यांचा राब जातो व उग्र लागत नाहीत.
- एका प्लेट किंवा वाडग्यात ओलं खोबरं आणि दाण्याचे कूट घ्यावे. त्यात थोडं तिळाचं कूट, तिखट, मीठ, हिंग, हळद, गोडा मसाला घालावा. (गरम मसालाही चालेल पण चिंच गूळ ओल खोबरं असल्याने काळा मसालाच जास्तं बरा). कोरडा मसाला नीट एकत्र करावा.
- चिंचेचा कोळ करून त्यात गूळ विरघळावा. हे ऐच्छिक आहे. हा कोळ कोरड्या मसाल्यात घालून सारण ओलसर करावे.
- एव्हाना वांग्यांचा राब गेला असेल, पाणी पिवळे झालेले असेल. वांगी बाहेर काढून झटकावीत.
- वांग्यांच्या दोन्ही बाजूंच्या चिरांमध्ये हलक्या हाताने सारण भरावे. कोरडे सारणसुद्धा भरू शकतो. सारण भरताना वांगी अखंडच राहिली पाहिजेत.
- कढईत थोडं जास्त तेल घेऊन नेहमीची फोडणी करावी. आवडत असेल तर बारीक चिरलेला कांदा (पातीचाही चालेल) व लसूण पेस्ट घालावी. यावर भरलेली वांगी सोडावीत व हळुवारपणे ढवळावीत.
- वांग्यांच्या सर्व बाजूंना फोडणी लागली पाहिजे. पाणी न घालता माध्यम किंवा बारीक गॅसवर १-२ मिनिटे झाकून ठेवावे. नंतर थोडे थोडे पाणी घालून ढवळावे. मीठ घालावे.
- कोरडे सारण भरले असेल तर पाणी घालताना चिंचेचा कोळ व गूळ घालावा. झाकण ठेऊन नीट शिजू द्यावीत.
- सारण उरले असेल तर वांगी शिजल्यावर वरूनच भाजीत घालावे. दाण्याच्या कूटामुळे ग्रेव्ही घट्ट होईल. वांगी मऊ होतील. कोथिंबीर घालून सजवावे.
Stuffed Brinjal Veg |
0 said:
Post a Comment
Your email id will always be confidential and safe.