Tags: Panipuri tikha chatni at home Pudina pani recipe in marathi tikhat chatani pudinyache pani street food chat panipuriche pani panipuri without masala, पानीपुरी
पाणीपुरीच्या तिखट चटणीचे साहित्य:
अंदाजे एक लिटर पाण्यासाठी -
कोथिंबीर
पुदिना
शेंदेलोण पादेलोण पैकी कोणतेही एक
२ दालचिनी
४ लवंग
१२ काळीमिरी
४-५ हिरव्या मिरच्या
जिरे व जिरेपूड
लसूण आवश्यक नाही, ऐच्छिक आहे. मी अजिबात घालत नाही.
पुदिना पानी कृती:
- मिक्सर मधून किंवा खलबत्त्याने दालचिनी, लवंग, मिरी यांची एकत्रित पूड करावी.
- ग्राईंडरमध्ये ४-५ हिरव्या मिरच्या घालाव्यात. मिरचीच्या तिखटपणानुसार प्रमाण ठरवावे.
- पोपटी रंगाच्या मध्यम तिखट मिरच्या ४-५ पुरतात. त्यात वाटलेली पूड व चिमूटभर जिरे घालून फिरवावे.
- त्यात एक वाटी निवडून धुतलेली कोथिंबीर आणि पाऊण वाटी निवडून धुतलेला पुदिना घालावा. परत फिरवावे. थोडे थोडे पाणी घालून अगदी मऊ एकजीव गडद हिरवी पेस्ट करावी.
- हे मिश्रण चहा गळतो त्या गाळणी घेऊन चमच्याने दाबून गाळून घ्यावे.
- तरी बराचसा भाग गाळण्यात शिल्लक राहतो. त्यामुळे चोथ्यात परत पाणी घालून परत गाळून घ्यावे. असे बरेच वेळा करावे म्हणजे मिश्रणाचा संपूर्ण अर्क पाण्यात उतरेल.
- एक लिटर पाणी बरोबर बसते.
- यात शेंदेलोण किंवा पादेलोण पैकी कोणतेही असेल ते एक घालावे. सध्या मिठाची गरज नाही.
- चव घेऊन अंदाज घ्यावा. चमचाभर जिरेपूड घालावी. अगदीच वाटल्यास चाट मसाला किंवा साधे मीठ घालावे; पण क्वचितच लागेल.
Tikha Pani, Pudina pani for panipuri |
Panipuri |
चविष्ट आणि कोणताही पदार्थ रेडिमेड न आणता केलेली पाणीपुरीच्या चटणी / पाणीपुरीचे पाणी कसे वाटले त्याबद्दल नक्की कमेंट करा.
0 said:
Post a Comment
Your email id will always be confidential and safe.