Ginger vadi aalyachi vadi recipe in marathi
३० मिनिटेसाहित्य:
चांगलं आलं - पाव किलोसाखर - अर्धा किलो
दुधाची जाड साय - अर्धा कप
बदाम, थोडे तूप, जराशी (४ चमचे) पिठीसाखर
कृती:
आले धुवून कोरड्या कपड्याने नीट पुसून स्वच्छ करावे.चमच्याने किंवा चाकूनी कोरड्या झालेल्या आल्याची सालं काढावीत.
आल्याच्या बारीक चकत्या कराव्यात. आलं किसू नये व थेट ग्राईंडसुद्धा करू नये.
चकत्या केल्यानी आल्याचे धागे कापले जातात व खाताना तोंडात येत नाहीत.
ग्राइंडरमध्ये आल्याच्या चकत्या व मूठभर साखर घालून पूर्ण वाटून घ्यावे.
जाड baseच्या पातेल्यात हा आल्याचा गोळा, उरलेली साखर आणि दुधाची जाड साय घालून ढवळावे.
मंद गॅसवर ढवळत राहून साधारण अर्ध्या तासाने मिश्रण चिकट व एकजीव होत येईल.
घट्ट झाले कि खाली काढून त्यात पिठीसाखर व बदामाचे काप घालावेत.
तूप लावलेल्या थाळीत ओतून थापावे. थंड झाले कि वड्या पाडाव्यात.
थंडीच्या दिवसात या अतिशय उबदार आहेत. अपचन, अजीर्ण झाल्यास औषधी आहेत.
0 said:
Post a Comment
Your email id will always be confidential and safe.