Tags: Kadhi pakora pakode recipe in marathi gujrati kadhi gujrathi,गुजराथी कढी, कढी पकोडे
२० मिनिटे - ६ जणांसाठी
साहित्य:
५-६ कप जरासं आंबट ताक१ टेबलस्पून बेसन
१ दालचिनी, ४ लवंगा, ६ मिरी, १-२ वाळवलेल्या लाल गोल मिरच्या
मीठ साखर आलं कढीपत्ता कोथिंबीर जिरे
पकोड्यांचं साहित्य - कांदाभजी
कृती:
- अर्धी वाटी ताकात बेसन नीट मिक्स करावे. गुठळ्या नकोत.
- हे ताक, मीठ, साखर बाकीच्या टाकत घालून ढवळावे.
- आलं कढीपत्ता कोथिंबीर अगदी बारीक चिरून किंवा आवडत असल्यास पेस्ट करून घालावी.
- पातेल्यात तेल गरम करावे. त्यात जिरे व १-२ वाळवलेल्या लाल गोल मिरच्या घालाव्यात व हलवावे.
- हिंग घालावा. पिवळी कधी हवी असल्यास हळद घालावी नाहीतर घालू नये.
- १ दालचिनी, ४ लवंगा, ६ मिरी घालून लगेचच मिक्स केलेलं ताक घालावं.
- सतत ढवळत कढी उकळून वर आली कि झाली समजावे.
पकोड्यांची कृती: कांदाभजी
वाढण्याआधी कढीत पकोडे घालून एक उकळी आणावी. जास्त उकळूं नये.
Kadhi |
मुगाच्या डाळीची खिचडी
सांडगी मिरची / ताकातली मिरची
0 said:
Post a Comment
Your email id will always be confidential and safe.