Tags: Vegetable Pakode recipes in marathi, फळभाज्यांची भजी, कांदा, बटाट्याची भजी, सिमला मिरचीची भजी, वांग्याची भजी, केळ्याची भजी, घोसाळ्याची भजी, शिराळ्याची भजी, दोडक्याची भजी Vegetable bhaji pakode, Batata Simla mirch Brinjal Banana Gourds bhaji pakodaTage
इथे भज्यांची सर्वसाधारण कृती दिलेली आहे. या पद्धतीने कोणत्याही फळभाजीची भाजी करता येतात.
पालेभाज्यांची भजी करण्यासाठी अजून एक पोस्ट लिहिली आहे.
फळभाज्यांची भजी - कांदा, बटाट्याची भजी, सिमला मिरचीची भजी, वांग्याची भजी, केळ्याची भजी, घोसाळ्याची भजी, शिराळ्याची भजी, दोडक्याची भजी, कोबीची भजी, फ्लॉवरची भजी अशी अनेक भजी करतात. या प्रकारात पाण्याचा वापर होतो. मात्र कांद्याच्या सर्वांत प्रचलित भज्यांसाठी पाणी वापरात नाहीत. ती पोस्ट कांदाभजी इथे लिहिली आहे.
मिरच्यांच्या भजीची पोस्ट वेगळी लिहिली आहे.
साहित्य:
कोणतीही फळभाजी - वर लिहिलेल्या भाज्या भज्यांसाठी जास्त प्रचलित आहेत.
बेसन, पाणी
तिखट, मीठ, हिंग, हळद, धणेजिरे पावडर,
ओवा, बारीक चिरलेली कोथिंबीर
भजी कशी करावी रेसिपी कृती:
- एका भांड्यात बेसन घेऊन त्यात तिखट, मीठ, हिंग, हळद, ओवा, धणेजिरे पावडर, बारीक चिरलेली कोथिंबीर हे सर्व घालावे.
- थोडे थोडे पाणी घालत गुठळ्या होऊ न देता मिश्रण भिजवावे. अगदी सैलसर नको. दाट असले पाहिजे.
- गरम तेलाचे २ चमचे मोहन घालावे.
- वरीलपैकी कोणतीही भाजी स्वच्छ धुवून कोरडी करावी. त्याचे गोल काप करावेत. कांद्याचेही गोल काप करून भजी करतात.
- हे काप बेसनाच्या मिश्रणात भिजवून गरम तेलात तळावे.
टोमॅटो सॉस किंवा ओल्या चटणीबरोबर खावे. फोडणीच्या ओल्या मिरच्या रुचिपालट म्हणून सोबत द्याव्यात.
विशेष टीप:
- काहीजण भज्यांच्या पिठात सोडा घालतात. हॉटेलमध्ये जास्त प्रमाणात भजी करण्यासाठी आणि बराच काळ पर्यंत तशीच ठेवण्यासाठी सोडा घालतात. घरीच करून खाण्यासाठी विशेष गरज नसते.
- पण तरीही सोडा घातल्यास हळद घालू नये. सोड्यामुळे तेलही जास्त लागते.
- भजीच्या पिठात २ चमचे रवा मिसळल्यास जास्त खुसखुशीत होतात.
- भजी हलकी होण्यासाठी तुरीचे किंवा मुगाचे वरण घालता येते. पण तेव्हा सोडा घालू नये.
- फ्लॉवरची भजी करताना तुरे आधी थोडे वाफवून घ्यावेत,
Onion Pakode Kandabhaji |
0 said:
Post a Comment
Your email id will always be confidential and safe.