Tags: marathi Kala masala goda masala maharashtrian spices everyday sabzi masala recipe,काळा मसाला, गोडा मसाला
English version available at Maharastrian Kala Masala in Englishकाळ्या मसाल्याचे साहित्य:
तीळ - अर्धी वाटीखोबरं (सुकं) - अर्धी वाटी
धणे - ३ वाट्या
जिरे - अर्धा वाटी
शहाजिरे - १ मोठा चमचा
दगडफूल - १ मूठ
दालचिनी - ५-६ काड्या
लवंग - १ मोठा चमचा
मसाला वेलदोडे - ४ नग
मिरे - २ चमचे
मेथी दाणे - १ चमचा
तमाल पात्र - ६ पाने
खडा हिंग (हिरा हिंग) - चिंचोक्याइतका खडा
मीठ, तेल, तिखट (किंवा लाल मिरच्या; शक्यतो तिखट बरं), हळद
गोडा मसाला रेसिपी - कृती:
- तीळ भाजावेत. सुक्या खोबऱ्याचा कीस भाजावा. वेगवेगळा भाजावा. करपवू नये.
- बाकीचं साहित्य तेलात परतायचं आहे. एकत्र परतू नये. वेगवेगळं परतावं.
- उरलेलं प्रत्येक साहित्य (जिऱ्यापासून तमालपत्रापर्यंत, धणे सर्वात शेवट) तेलात वेगवेगळं परतावं.
- प्रत्येक गोष्ट ग्राईंडरमधून बारीक वाटायची आहे. वेगवेगळी वाटावी. एकत्र वाटू नये.
- सर्वप्रथम तीळ बारीक करावेत.
- यानंतर एका कढईत तेल घेऊन मोहरी, हिंग, हळदीची फोडणी करा. गॅस बंद करून मग तिखट घाला.
- नंतर सर्व जिन्नसांची केलेली पूड घालून एकत्र ढवळा.
- परत एकदा हलकेच मिक्सरमधून काढा म्हणजे नीट मिळून येईल.
Click below to read the recipe in english-
Maharashtrian Goda masala in english
0 said:
Post a Comment
Your email id will always be confidential and safe.