Tags: Rice flakes Chiwda patal pohyancha chivada chiva da recipe in marathi चिवडा, दिवाळीचा फराळ, chiwada, भाजलेल्या पोह्यांचा चिवडा, bhajake pohe chivda, yellow chivda
पोह्याच्या चिवड्याचे साहित्य:
पातळ पोहे - अर्धा किलोडाळं - १ वाटी
कढीपत्ता - १ वाटी
आलं - अर्धी वाटी
सुक्या खोबऱ्याचे बारीक काप - पाव वाटी
तीळ - पाव वाटी
शेंगदाणे - अर्धी वाटी
काजू - अर्धी वाटी
मिरच्यांचे तुकडे - अर्धा वाटी
ओवा - २ चमचे
धणेजिरे पावडर, मीठ, साखर
भाजक्या पोह्याचा चिवडा रेसिपी - कृती:
- पातळ पोहे उन्हात वाळवून गॅस वर भाजून घ्या.
- मायक्रोवेव्हमध्ये पटकन आणि सुंदर भाजले जातात. उन्हाची गरज नाही व आकारही बदलत नाही.
- कढईत तेल घेऊन त्यात क्रमाक्रमाने डाळं, काजू, शेंगदाणे तळून बाजूला काढावेत.
- ह्या तळलेल्या गोष्टी भाजलेल्या पोह्यांवर टाकाव्यात. पोहयांत मीठ साखर घालावे.
- मोठ्या पातेल्यात तेल घेऊन त्यात मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता, मिरच्या, तीळ, ओवा, आलं घालावे व पोह्यांचे मिश्रण ओतावे. गॅस बंद करून कालथ्याने पोहे मोडू न देता ढवळावे. किंवा पातेल्यातल्या पातेल्यातच पाखडावे.
- Citric acid crystals आंबटपणासाठी वापरायचे असल्यास वरून घालावेत. नाही घातले तरी चिवडा छानच लागतो.
0 said:
Post a Comment
Your email id will always be confidential and safe.